Bad Habit : आपल्या रोजच्या जीवनात अनेक सवयी अशा आहेत, ज्या आपल्या गंभीर आजाराचे कारण बनू शकतात. पण त्या सवयी आपल्याला सोडणं शक्य होत नाही. आणि नंतर त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात.
सवयींचा विषय निघाला तर केवळ व्यसन आणि खाण्याच्या सवयी नाही. तर बसण्याच्या सवयीचाही तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक लोकांना पायावर पाय टाकून बसण्याची सवय असते. ऑफीसमधील काम सुरू असताना जेव्हा ८ तास सलग एकाजागी बसण्याची वेळ येते. तेव्हा काही लोक दर पाच मिनिटाला बसण्याची पोझ बदलत असतात.
तर काही लोक, मुव्ही बघताना सलग तीन तास पायावर पाय टाकून बसतात. अशामुळे त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यात पायात रक्ताच्या गाठी होणे, रक्ताभिसरण सुरळीत न होणे, ब्लड प्रेशरची समस्या अशा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. याच आजारांबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
हिपचा आकार बिघडू शकतो
सतत एकाच जागी बसल्याने आणि पायावर पाय टाकून बसल्याने ही समस्या होऊ शकते. अशा स्थितीत बसल्याने हिपचा आकार वरखाली होऊ शकतो. त्यामुळे सतत अशी बसण्याची सवय असेल तर काळजी घ्या.
रक्ताभिसरण विस्कळीत होते
पायाच्या वर पाय ठेवून बसल्याने रक्ताभिसरण विस्कळीत होते. जेव्हा आपण दुसरा पाय एका पायावर ठेवतो तेव्हा पायाच्या खालच्या भागाकडे जाणाऱ्या वाहिन्यांमधील रक्ताभिसरण थांबते. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. ज्यामुळे रेस्टलेस लेग सिंड्रोम आणि पायात दुखण्याची तक्रार होते.
उच्च रक्तदाबाची समस्या
सतत क्रॉस लेग बसून राहिल्याने पायातील रक्ताभिसरण थांबू लागते. ज्यामुळे हृदयाला वेगाने रक्त पंप करावे लागते आणि परिणामी रक्तदाब जास्त होतो. हॉस्पिटलमध्ये रक्तदाब तपासला तर दोन्ही पाय नेहमी जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून रक्तदाब योग्य प्रकारे मोजता येईल.
स्पर्मच्या क्वालिटीवर परिणाम होतो
हो, संशोधनानुसार पायावर पाय ठेऊन बसल्याने शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम होतो. अशा बैठकीमुळे अंडकोषाचे तापमान सामान्यपेक्षा २-६ अंशांनी वाढते. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.