Homemade Aloe Vera Facial : त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमित स्किन केअर रूटीन फॉलो करणे गरजेचं आहे. यासाठी बहुतांश जण ब्युटी पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करतात. पण केमिकलयुक्त ट्रीटमेंटमुळे चेहऱ्यावरील चमक काही दिवसांतच नाहीशी होते. याऐवजी आपण घराच्या घरी नैसर्गिक सामग्रींचा वापर करून फेशिअल करू शकता.
यासाठी आपण तांदळाचे पीठ, मुलतानी मातीचाही उपायोग करू शकता. पण कोरफडीचा गर सर्वोत्तम उपाय ठरेल. कोरफडमधील नैसर्गिक गुणधर्मांमुळे त्वचेशी संबंधित सर्व समस्या कमी होण्यास मदत मिळते. शिवाय त्वचेवर नॅचरल ग्लो देखील येईल. घरच्या घरी Aloe Vera Facial कसे करायचे, जाणून घेऊया सविस्तर…
घरात कोरफडीचे रोप असल्यास त्यातील एक मोठे पान कापून काढा आणि स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर हे पान मध्यातून कापा.
कोरफडीचा गर एका बाऊलमध्ये काढावा. यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ मिक्स करावे.
दोन्ही सामग्री नीट मिक्स करावी.
हे मिश्रण चेहऱ्यावर लावा व दोन ते तीन मिनिटांसाठी हलक्या हाताने स्क्रब करावा.
तांदळाच्या पिठामुळे त्वचा एक्सफॉलिएट होते. यानंतर पाच मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
कोरफडमुळे त्वचेला किती जबरदस्त फायदे मिळतात, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण कोरफडीचा गर आणि तांदळाचे पीठ एकत्रित करून लावल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल. कोरफडमुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझर मिळते.
तर तांदळाच्या पिठामुळे मृत त्वचेची समस्या कमी होते. तसंच यामुळे त्वचेवर कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी स्किन केअर रूटीनमध्ये नैसर्गिक उपचारांचा समावेश करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.