Beauty Tips  esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : दररोज काजळ अन् आयलायनर लावल्याने डोळ्यांना होऊ शकते का नुकसान?

Eyeliner Routine : काजळ आणि आयलायनर आपल्या डोळ्यांना सुंदर बनवते. काजळ लावल्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खोलून येते.

सकाळ डिजिटल टीम

Beauty Tips :

आपल्या चेहऱ्याचा मेकअप हा डोळ्यात काजळ घातल्याशिवाय पूर्ण होत नाही. डोळ्यात काजळ आणि आयलायनर लावणे आता नेहमीचे झाले आहे. काजळ आपल्या डोळ्यांना थंडावा देते त्यामुळेही काही महिला दररोज रात्री झोपताना डोळ्यांना काजळ लावतात.

काजळ आणि आयलायनर आपल्या डोळ्यांना सुंदर बनवते. काजळ लावल्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खोलून येते. पण दररोज काजळ लावणे आपल्यासाठी हानिकारक असू शकते. कारण, काजळ आणि आयलायनरमध्ये असलेले काही घटक आपल्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकतात. सतत काजळ लावल्याने आपल्या दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ.ए.के.ग्रोवर सांगतात की, आपले डोळे खूप सेन्सिटिव्ह असतात. काजळात असलेले काही केमिकल्स आपल्या डोळ्यांमध्ये इन्फेक्शन पसरवू शकतात. यामध्ये डोळे लाल होणे, डोळे कोरडे होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

डॉक्टर पुढे सांगतात की, या समस्या होऊ नये तसे वाटत असेल तर काजळ लावल्यानंतर काही तासानंतर ते काढून टाका. तसेच कुठल्याही केमिकल युक्त उत्पादनाचा वापर करताना आधी ते तपासून मगच डोळ्यांवरती वापरा. तसेच एखादे प्रॉडक्ट वापरून तुम्हाला त्रास होत असेल तर ते पुन्हा पुन्हा वापरू नका.

डोळ्यांवर काजळ लावण्या बाबतीत या गोष्टी लक्षात घ्या. 

काजळ आणि आयलायनर शिवाय मेकअप अपूर्णच असतो. पण कुठल्याही हलक्या दर्जाचे काजळ वापरू नका. ब्युटी एक्सपर्टनी सांगितलेले काजळ वापरण्याकडे लक्ष द्या. तसेच मेकअप रिमूव्ह करताना चांगल्या क्वालिटीच्या मेकअप रिमूव्हरचा वापर करा.

डोळ्यांचा मेकअप काढल्यानंतर डोळ्यांवरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. किंवा डोळ्यांवरती थंड पाण्याचे शिंतोडे मारा.

काजळ किंवा आयलाइनर लावून कधीही झोपू नका. आपण सात ते आठ तासांची झोप घेतो. या काळात तुमच्या डोळ्यांवरील मेकअप काढून टाका. ठेवल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

आजकाल बाजारात ब्रशमध्ये असलेले काजळ उपलब्ध आहेत. तुम्ही डोळ्यांवर त्याचा प्रयोग करताना तुमचे हात आणि तो ब्रश स्वच्छ असल्याचे खात्री करा. हाताला किंवा ब्रश वरती असलेली घाण किंवा धुळ तशीच आपल्या डोळ्यात जाऊ शकते. आणि याचा तुम्हाला त्रास होईल.

डोळ्यांच्या कडांवरती काजळ लावणे टाळा. आपण नेहमी काजळ लावतो ते अगदी डोळ्यांच्या आतमध्ये पर्यंत गेलेले असते. त्यामुळे असे न करता डोळ्यांपासून थोडे अंतर ठेवूनच याचा वापर करा. हे केमिकल युक्त गोष्टी डोळ्यांमध्ये गेल्याने तुम्हाला अनेक गोष्टींचा त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT