केळ्याचा फेसपॅक Esakal
लाइफस्टाइल

केळ्यापासून तयार करा हे ४ फेसपॅक, Banana Face Pack मुळे चेहऱ्यावर येईल चमक

Kirti Wadkar

चेहरा सुंदर दिसावा, चेहऱ्यावरील डाग नाहीसे व्हावेत आणि चेहऱ्यावर ग्लो यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण विविध उपाय देखील करतात. मग पार्लसमध्ये जाऊन फेशियल करणं असो किंवा विविध Skin Treatment घेणं. Beauty Tips Marathi Benefits of Banana Face Pack for Face Skin Glow

तसंच बाजारातील विविध स्किन केअर प्राॅडक्ट Skin Care Products वापरणं असो, त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण असंख्य पर्याय ट्राय करतात आणि त्यासाठी पैसे देखील खर्च करतात. मात्र अत्यंत कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या पर्यायांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो. यापैकीच एक म्हणजे केळं Banana.

केळ्याच्या सेवनाचे आरोग्यासाठी जसे अनेक फायदे आहेत तसंच केळ्याचे त्वचेसाठी Banana For Health देखील बरेच फायदे आहेत. केळ्यामध्ये असलेल्या झिंक, पोटॅशियम आणि कॅल्शियममुळे त्वचेचे सेल्स स्वच्छ होण्यास आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

तसचं केळ्यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे त्वचेतील ऑक्सिजन आणि ब्लड फ्लो वाढण्यास मदत होते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. केळ्यामध्ये काही इतर पदार्थ मिसळून तुम्ही विविध फेसपॅक तयार करू शकता. या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येईल. केळ्याचे हे विविध फेसपॅक तुमच्या महागड्या स्किन केअर प्राॅडक्टपेक्षा जास्त प्रभावी ठरतील.

हे देखिल वाचा-

बनाना ओट्स फेसपॅक

चेहऱ्याची टॅनिंग दूर करून चेहरा उजळण्यासाठी बनाना ओट्स फेसपॅकची मदत होवू शकते. यासाठी ओट्सची पावडर तयार करून घ्या. त्यानंकर अर्ध पिकलेलं केळं मॅश करून त्यात २ चमचे ओट्स पावडर टाका. चांगली पेस्ट तयार करून ही पेस्ट चेहऱ्याला १० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

या फेसपॅकमुळे तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. आठवड्यातून किमान २ वेळा या फेसपॅकचा वापर करा.

मध आणि केळं

मध आणि केळ्याच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि पिंपल्सचे डाग फिके होण्यास मदत होईल तसंच चेहऱ्यावर ग्लो येइल. यासाठी पिकलेलं केळ मॅश करून त्यात १ चमचा मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टने चेहरा मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा धुवा. आठवड्यात २-३ वेळा हा फेसपॅक लावल्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

हे देखिल वाचा-

बनाना मिल्क फेसपॅक

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी केळं आणि दूधाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. यासाठी केळ आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि चमकदार होण्यास मदत होईल.

केळं आणि दही

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डागांची समस्या दूर करण्यासाठी केळं आणि दह्याचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी पिकलेलं केळं मॅश करून त्यात १ चमचा दही आणि थोडा संत्र्याचा रस टाका. हा फेसपॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो देखील येईल.

अशा प्रकारे केळ्यापासून तयार करण्यात आलेल्या या मास्कमुळे त्वचेवर ग्लो येण्यास मदत होईल आणि चेहरा तरुण दिसू लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भिवंडीत विसर्जनास चाललेल्या गणेशमूर्तीवर दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्त्यांकडून 'जय श्रीराम'ची घोषणाबाजी

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, अॅक्सीलेटरवर पाय पडला अन्...

Ganesh Visarjan : रात्री 12 नंतर साऊंड सिस्टिम लावण्यावरुन पोलिस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने, कराडात तणाव

Ganesh Visarjan 2024 LIVE : भिवंडीत विसर्जनास चाललेल्या गणेश मूर्तीवर दगडफेक, पोलिसांनी केला लाठीचार्ज

Mangalore Crime : समाजकंटकांकडून प्रार्थनास्थळावर तुफान दगडफेक, खिडक्यांच्या फोडल्या काचा; सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT