how to do pedicure at home Esakal
लाइफस्टाइल

Pedicure करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, घरीच करा पेडीक्योर आणि पहा कमाल

How to do pedicure at Home: पायांसाठी पार्लरमध्ये Beauty Parlour जाऊन पैसा वाया घालवण्याची अनेकांची इच्छा नसते. मात्र पेडीक्योर Pedicure करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही

Kirti Wadkar

How to do pedicure at Home: स्वच्छ आणि सुंदर पायांवरून बऱ्याचदा एखाद्याचं व्यक्तीमत्व दिसून येतं. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची Face किंवा केसांची काळजी घेता अगदी त्याचप्रमाणे पायांची देखभाल करणंही अत्यंत गरजेचं आहे. Beauty Tips Marathi Do Pedicure at Home

अनेकजण चेहऱ्याची आणि केसांची Hair काळजी घेतात यावेळी हात आणि पायांकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जातं. अनेक महिला वेळोवेळी पार्लरमध्ये Beauty Parlor जाऊन फेशियल किंवा मसाज तर करतात. मात्र पेडीक्योर Pedicure किंवा मेनीक्योर कऱणं म्हणजे वायफळ खर्च समजतात.

पायांसाठी पार्लरमध्ये Beauty Parlour जाऊन पैसा वाया घालवण्याची अनेकांची इच्छा नसते. मात्र पेडीक्योर Pedicure करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरीच काही बेसिक वस्तूंच्या मदतीने पेडीक्योर करू शकतात. home pedicure

घरच्या घरी पेडीक्योर करण्यासाठी कोणत्या वस्तू लागतील आणि कोणत्या पद्धतीने पेडीक्योर करावं यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत.

स्टेप १- नेलपेंट काढून नखं कापणं

पेडीक्योर करण्यासाठी सर्वप्रथम नंखावरील नेलपेंट नेलपेंट रीमूव्हरच्या मदतीने पूर्ण काढून टाका. त्यानंतर तुम्हाला हवी असलेल्या लांबी आणि आकाराप्रमाणे नेलकटरच्या मदतीने नखं कापून त्यांना फाइलकरून शेप द्या. नखांना शेप देण्यासाठी तुम्ही नेलकटरच्या मागील बाजूल असलेलं फायलर वापरू शकता.

स्टेप २- गरम पाण्याच पाय भिजवा

नखं काढल्यानंतर नखांना तुमच्याकडे असलेलं एखादं लिप बाम लावा किंवा मध लावा. त्यानंतर एका टबमध्ये किंवा बादलीमध्ये पाय बुडतील एवढं गरम पाणी घ्या. पाणी जास्त गरम नसावा. पायाला सोसेल एवढं गरम पाणी घ्यावं. Skin care

गरम पाण्यामध्ये एक चमचा शॅम्पू आणि अर्धा चमचा कंडिशनर टाका. यात एक चमचा लिंबाचा रस टाका. त्यानंतर या गरम पाण्यामध्ये साधारण १०-१५ मिनिटं पाय बुडवून ठेवा. पाण्यातून पाय बाहेर काढल्यानंतर घरात असलेल्या एखाद्या जुन्या टूथब्रशच्या मदतीने नखं स्वच्छ करा.

हे देखिल वाचा-

स्टेप ३- होममेड स्क्रबने पाय स्वच्छ करा.

पाण्यामध्ये पाय भिजल्याने त्यावरील डेड स्किन आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही प्युबिक स्टोनने तुमच्या टाचा स्क्रब करू शकता. त्यानंतर एका होममेड स्क्रबच्या मदतीने पाय स्क्रब करा. यासाठी २ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात एक चमचा नारळाचं तेल आणि अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा.

एका लिंबाच्या स्लाइसच्या मदतीने हे मिश्रण पायांना चांगलं स्क्रब करा. ५ मिनिटांसाठी हा पॅक पायांवर राहू द्या त्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवा. या पॅकमधील बेकिंग सोड्यामुळं डेडस्किन निघण्यास मदत होईल. तसचं लिंबू आणि नारळाच्या तेलामुळे टॅनिंगही कमी होवून त्वचा मऊ होईल.

स्पेट ४- मसाज

पाय कोरडे झाल्यानंतर २ चमचे नारळाचं तेल कोमट करा. त्यानंतर हे नारळाचं तेल संपूर्ण पायांना व्यवस्थित लावून जवळपास ५ मिनिटांसाठी मसाज करा. टाचा तसचं बोट आणि घोटे यांना व्यवस्थित मसाज करा.

त्यानंतर एखादा टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो चांगला पिळून त्यात पाय गुंडाळा. ५ मिनिटांसाठी पाय गरम टॉवेलमध्ये राहू द्या. त्यानंतर याच टॉवेलने पायांवरील तेल पुसून घ्या.

स्टेप ५ घरगुती मास्क

यानंतर पायांना घरीच तयार केलेला मास्क तुम्ही लावू शकता. यासाठी २ चमचे तांदळाच्या पिठात हळद आणि दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायाला लावा आणि १५ मिनिटं राहू द्या. १५ मिनिटांनी हात ओला करून वाळलेला मास्क स्क्रब करून काढा.

त्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवून कोरडे करा.

स्टेप ५ पायांना बनवा सुंदर

पेडीक्योर झाल्यानंतर पायांना तुम्ही वापरत असलेलं बॉडी लोशन लावा. त्यानंतर नखांना नेलपेंट लावा. अशाप्रकारे पार्लर सारखंच पेडीक्योर तुम्ही घरच्या घरी करू शकता. यामुळे तुमचे पाय मुलायम होतील. तसचं पायांची टॅनिंग दूर होऊन पाय उजळतील. पायावरील डागही नाहीसे होवून तुमचे पाय सुंदर दिसू लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT