beauty tips sakal
लाइफस्टाइल

Beauty Tips: दह्याने वाढवा चेहऱ्याचं सौंदर्य, घरच्या घरी ट्राय करा फेसपॅक

सहसा आपण दही हे खाण्यासाठीच वापरतो पण आज आपण दह्यापासून बनविलेला फेसपॅकविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

सुंदर दिसण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करत असतो. कधी अनेक प्रकारचे घरगुती उपाय तर कधी महागडे प्रोडक्ट. अनेकदा इतकं सर्व करुनही काहीच फायदा होत नाही पण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी फेसपॅक कसा करायचा, हे सांगणार आहोत.

सहसा आपण दही हे खाण्यासाठीच वापरतो पण आज आपण दह्यापासून बनविलेला फेसपॅकविषयी जाणून घेणार आहोत. हा फेसपॅक कसा बनवायचा, याविषयी चला तर जाणून घेऊया. (try face pack from curd at home and increase beauty of face )

  • दोन चमचे दहीत एक चमचा एलोवेरा जेल आणि दोन चमचे मुलतानी माती एकत्र करून घ्यावी  त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा . १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर असू द्या त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. नंतर चेहऱ्यावर गुलाबजल लावावे. 

  • दही, एलोवेरा जेल आणि थोडी हळद एकत्र करत आणखी एक फेस पॅक तयार करता येतो. हा फेसपॅक चेहऱ्यावर १० मिनिटे ठेवावा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धूवावा. यामुळे चेहऱ्यावर तेज येतं.

  • तसेच हळद, दही आणि मध मिक्स केलेला फेस पॅकही चेहऱ्यासाठी उत्तम आहे. यामुळे चेहरा आणखी खुलून येतो आणि चेहऱ्यावर चमक येते.

  • याशिवाय फक्त दह्याने चेहऱ्यावर  मसाज केल्यानेही चेहरा आणखी खुलून उठतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT