kesar beauty tips  esakal
लाइफस्टाइल

Kesar Beauty Tips : कोणत्याही क्रिमला जमणार नाही ते केशर करेल; 15 दिवसात फरक अनुभवा

saffron for skin whitening: केशर हे सर्वात महाग मसाल्यापैकी एक आहे.

Pooja Karande-Kadam

Kesar Beauty Tips : क्रिम फेशिअल महागड्या ट्रिटमेंटचा घाट घालून उजळ त्वचा मिळवण्यासाठी धडपड सुरू असते. पण, आपल्या आवती भवती असलेल्या अनेक गोष्टीतून सौंदर्य सहज मिळवता येतं. ही गोष्ट आपण विसरून गेलो आहोत.

पुर्वी लोक अनेक उपाय करायचे पण त्याच्या रिझल्टसाठी थांबायचे. आता कोणतीही गोष्ट केली की लोकांना इंस्टंट रिझल्ट हवा असतो. बरं हे पार्लर, हॉस्पिटलचे प्रयोग करून मिळणारं सौंदर्य जास्त वेळापर्यंत टिकत नाही. तुम्हाला जास्त दिवस टिकणारं सौंदर्य हवं असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगितलेला प्रयोग नक्की करा.(Beauty Tips : Use saffron in this way to improve the complexion of the face, the difference will be visible in 15 days)

तुम्ही घरात वापरले जाणाऱ्या अनेक वस्तूंचा वापर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी करू शकता. पण आज आपण जी वस्तू पाहणार आहोत ती नॅटरल असून सहसा घरात उपलब्ध होत नाही. ती गोष्ट म्हणजे केशर. केशराचा उपयोग औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

केशर खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील, पण चेहऱ्यावर लावल्यानेही अनेक फायदे होतात. प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे चेहऱ्याचा रंग कमी होतो आणि पावसाळ्यात चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी केशराचा वापर फायदेशीर ठरतो.

 केशर हे सर्वात महाग मसाल्यापैकी एक आहे. त्याची किंमत प्रति पौंड $500 ते $5000 पर्यंत असू शकते. वर्षाला 300 टन केशराचे उत्पादन होते. केशर उत्पादनात इराणचा सर्वात मोठा वाटा आहे, जे एकूण उत्पादनाच्या सुमारे 76 टक्के उत्पादन करते. (Saffron)

केशराला अनेक नावांनी ओळखलं जातं. आपण त्याला केशर म्हणतो, तर हिंदी भाषेत त्याला केसर म्हणतात. बंगालीमध्ये जाफरान, तामिळमध्ये कुंकुमापू, तेलुगुमध्ये कुमकुमा पुब्बा, अरबीमध्ये जाफरान अशी वेगळी नावे त्याला आहेत.

केशराचे पाणी

केशरच्या वापरामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर होतात. केशराच्या पाण्याने चेहरा रोज धुतल्याने तेलकट आणि कोरडी त्वचा दूर होते. केशरचे पाणी बनवण्यासाठी 2 लिटर पाण्यात केशरचे 8 ते 10 धागे टाकून रात्रभर ठेवा. सकाळी या पाण्याने चेहरा स्वच्छ करा आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी केशर पाण्याने चेहरा धुवा. 15 दिवस असे केल्यास चेहऱ्यावर परिणाम स्पष्ट दिसतील.(Beauty Tips)

त्वचेसाठी केशर दूध

दूध आपल्या सौंदर्यांसाठी अनमोल आहे. दुधाचे सेवन केले तरीही ते फायद्याचं ठरतं. तुम्हाला केशर आणि दूध एकत्र चेहऱ्याला लावल्याने अनेक फायदे मिळतील.  

या प्रयोगासाठी एका भांड्यात केशराचे ४ ते ५ धागे मिक्स करून रात्रभर ठेवा. सकाळी या दुधाने चेहऱ्याला मसाज करा आणि त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. केशरचे दूध चेहऱ्यावर रोज लावल्याने चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. (Milk For Skin)

 

खोबरेल तेल आणि केशर

खोबरेल तेलात केशर मिसळून लावल्यानेही चेहरा उजळतो. यासाठी 4 ते 5 केशराचे धागे 2 चमचे पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी केशर पाण्यात 1 चमचे खोबरेल तेल मिसळून चेहऱ्याची मालिश करा आणि 30 ते 40 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. दररोज असे केल्याने चेहऱ्यावर परिणाम दिसून येईल. (Coconut Oil)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT