Hair Care Tips  Sakal
लाइफस्टाइल

Hair Strengthening Tips : केसांसाठी या चॉकलेटी रंगाच्या बियांचा करा वापर, मिळतील हे 4 महत्त्वपूर्ण फायदे

केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी हेअर केअर रूटीनमध्ये या बियांचा करा समावेश

Harshada Shirsekar

काळेभोरे, लांबसडक आणि सुंदर केस (Hair Care Tips In Marathi) मिळवण्यासाठी लोक कित्येक प्रकारचे उपाय करतात. काही जण तर ब्युटी पार्लरमधील महागड्या आणि केमिकलयुक्त ट्रीटमेंट्सही करतात. पण यामुळे केसांना फायदे मिळण्याऐवजी नुकसानच अधिक होते. 

म्हणूनच केसांचे नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक औषधोपचार (Natural Hair Care Tips) करण्यावर भर द्यावा. या लेखाद्वारे आपण अशाच एक नैसर्गिक उपचाराची माहिती जाणून घेणार आहोत. अळशीच्या बियांचे सेवन करण्याचे फायदे तुम्हाला माहितीच असतील. पण या बियांमुळे केसांच्या आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया… 

अळशीच्या बियांमधील पोषक घटक

अळशीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे आणि हे घटक केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत.

केस पातळ होण्याची समस्या येते नियंत्रणात 

अळशीच्या बियांमुळे केस लांबसडक व जाड (Long Hair Care Tips In Marathi) होऊ शकतात. कारण या बियांमध्ये  ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर आणि प्रोटीन यासारख्या पोषणतत्त्वांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. हे सर्व पोषक घटकांमुळे केसगळती होणे व केस पातळ होणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

कोंड्याची समस्या

अळशीतील औषधी गुणधर्मामुळे केसांमधील पीएचची पातळी संतुलित होण्यास मदत मिळू शकते. शिवाय स्कॅल्पवरील सीबमचा स्त्राव देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यामुळे टाळूच्या त्वचेवर होणाऱ्या अ‍ॅलर्जी/ कोंड्याचा धोका कमी होतो. कारण अळशीमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात.

केसांचे मूळ होतात मजबूत

अळशीच्या बिया व अळशीच्या तेलामध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ईचे गुणधर्म असतात. यामुळे केस मुळासकट मजबूत होण्यास मदत मिळते. अळशीच्या तेलाने केसांचा मसाज केल्यास टाळूच्या भागातील रक्तप्रवाह अधिक चांगला होता.

टाळूची निरोगी त्वचा

अळशीच्या बियांपासून तयार केलेल्या पेस्टचा वापर केल्यास टाळूच्या त्वचेशी संबंधित सर्व समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. कारण या बियांमध्ये अँटी- फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फंगस समस्येपासून बचाव होण्यास मदत मिळते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT