उन्हाळा सुरु झाला की बाजारपेठांमध्ये कैऱ्या, आंबे,जांभूळ,ताडगोळे, फणस अशा असंख्य फळांची रेलचेल पाहायला मिळते. या फळांच्या वासाने संपूर्ण बाजारपेठ घमघमून जाते. त्यामुळे आपोआपच महिलावर्गाची पावलंही या बाजाराकडे वळतात आणि मग या फळांपासून विविध पदार्थ स्वयंपाक घरात होऊ लागतात. कधी कैरीचा मोरंबा, कैरीचं पन्हं, आंब्याचं सरबत, फणसाची पोळी असे असंख्य पदार्थ गृहिणी मोठ्या हौशीने करतात. परंतु, बऱ्याचदा घरी फणस आणल्यानंतर त्याच्यातील अठळ्या म्हणजेच फणसाची बी टाकून दिली जाते. खरं तर ही बी अत्यंत गुणकारी असून तिचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच फणसाच्या बियांचे फायदे काय ते आज आपण जाणून घेऊयात.
१. शरीराच्या योग्य वाढीसाठी -
बऱ्याचदा लहान मुले जेवतांना तक्रारी करतात त्यामुळे मग अपूर्ण पोषण, शरीराची कमी वाढ अशा समस्या मुलांमध्ये निर्माण होतात. यावर बेस्ट ऑप्शनमध्ये फणसाच्या अठळ्या. फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व आणि अन्य गुणधर्म आहेत. त्यामुळे या बिया मुलांना उकडून खायला द्याव्यात. या बियांमुळे मुलांची शारीरिक व मानसिक वाढ योग्यरित्या होते. जर मुलं उडकलेल्या बिया खात नसतील तर त्या आमटीमध्येदेखील टाकता येतात.
२. हाडे मजबूत होतात -
फणसाच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम असते. त्यामुळे हाडांना बळकटी मिळते. ज्यांना हाडांविषयी समस्या आहेत त्यांनी आवर्जुन फणसाची बी खावी.
३. ऊर्जा मिळते -
उन्हाळ्यात अनेकदा उकाडा, घाम यामुळे मरगळ येते, थकवा जाणवतो. परंतु, फणासाची बी खाल्ल्यावर थकवा दूर होईल. फणसाच्या बियांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसंच शरीरातील प्रोटिनची कमतरतादेखील भरुन निघते.
४. पचनक्रिया सुधारते -
काही जणांना पचनासंबंधी अनेक समस्या असतात. अशा वेळी फणसाची बी खावी यामध्ये डाएटरी फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते व बद्धकोष्ठतेसारखा त्रासही दूर होतो.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.