Benefits of Clove esakal
लाइफस्टाइल

Benefits of Clove : खोकल्यापासून ते पचनापर्यंतचे आजार दूर करण्यासाठी लाभदायी आहे लवंग, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Benefits of Clove : विविध खाद्यपदार्थांची चव वाढवणाऱ्या लवंगचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Clove : भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचा हमखास वापर केला जातो. या मसाल्यांशिवाय खाद्यपदार्थांना चव येत नाही. त्यामुळे, हे मसाले महत्वाची भूमिका पार पाडतात. या मसाल्यांमध्ये जिरे, हळद, दालचिनी, लवंग इत्यादी मसाल्यांचा समावेश होतो. या मसाल्यांपैकी एक असलेले लवंग आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

विविध खाद्यपदार्थांची चव वाढवणाऱ्या लवंगचे आरोग्याला अनेक फायदे होतात. लवंगमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. या लवंगमध्ये प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सोडिअम, लोह इत्यादी पोषकघटकांचा समावेश असतो. आज आपण लवंगचे आरोग्याला होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

पचनक्षमता सुधारते

लवंगमुळे पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. लवंग पचनास मदत करणारे एंजाइम्स (Enzymes) तयार करण्यास मदत करते. त्यामुळे, आपली पचनक्षमता निरोगी राहते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, त्यांनी त्यांच्या आहारात लवंगचा जरूर समावेश करावा. लवंगमुळे गॅस फुगणे, उलट्या होणे, इत्यादी समस्या दूर करण्यास मदत होते. (improves digestibility)

सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो

सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवल्यास लवंगचा अवश्य वापर करण्याचा सल्ला दिला जातो. खोकल्याची उबळ आली की, लवंग तोंडात चघळल्याने खोकल्याला प्रतिबंध घातला जातो.

लवंगमध्ये कफविरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे, दमा आणि खोकल्यासारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. विशेष म्हणजे खोकल्यावर आराम मिळवून देणाऱ्या अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये लवंगचा आवर्जून वापर केला जातो. (Provides relief from cold and cough)

मधुमेहींसाठी लाभदायी

लवंगचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे, ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात लवंगचा जरूर समावेश करावा. लवंगमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, यासोबतच यकृत ही निरोगी राहते. (beneficial for diabetics)

रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहते

लवंगमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते. या पोषकघटकांमध्ये मॅंगनीज आणि पोटॅशिअमसारख्या खनिजांचा ही समावेश आढळून येतो. ही खनिजे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्याचे काम करतात. त्यामुळे, रक्ताभिसरणाची प्रक्रिया ही सुरळीत राहते. यामुळे, हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. (blood circulation remains smooth)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT