Benefits of Ice Apple esakal
लाइफस्टाइल

Benefits of Ice Apple: उन्हाळ्यात ताडगोळा खाण्याचे तुम्हाला फायदे आहेत का?

Tadgola fruit benefits: तुम्ही याआधी कधी Ice Apple बद्दल ऐकले आहे का?

Pooja Karande-Kadam

Benefits Of Ice Apple: ताडगोळे हे अतिशय मऊ आणि रसदार असतात. त्यांच्यावर जाड साल असतं. ही सालं काढणं एक फार मोठं कंटाळवाणं काम आहे. मात्र एकदा का साल काढली तर आत रसदार पांढरे गरे म्हणजेच ताडगोळे असतात. ताडगोळे चवीला गोड असून प्रकृतीला थंड असतात.

हे एक पाणीदार फळ असल्यामुळं ते कापायची गरज नसते. या फळाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास फळाचा आरोग्यासाठी फायदाच होतो. ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं.

पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. हे फळ महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

ताडाच्या झाडांची लागवड समुद्रकिनारी अधिक होते. ताडगोळ्यांना बंगालमध्ये याला ‘ताल’, तेलुगूत ‘ताती मुंजलू’, तमिळमध्ये ‘नुग्नू’, इंग्रजीत ‘आईस ऍपल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावानं ओळखलं जातं.

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरात निर्जलीकरण होते आणि उर्जेची पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे आपल्याला विकनेस असल्यासारखे वाटते. त्यामुळे उन्हाळ्यात तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी टरबूज, आंबा, लिची, कस्तुरी, जर्दाळू, लिंबू इत्यादी अनेक हंगामी फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

तुम्ही याआधी कधी Ice Apple बद्दल ऐकले आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे दक्षिण भारतात आढळणारे फळ आहे आणि तिथले लोक ते आवडीने खातात. तो सामान्यतः 'ताडगोळा' म्हणून ओळखला जातो. ताडगोळा शरीरावर थंडावा ताडगोळ्यामध्ये पोषक घटक असतात.

ताडगोळा कार्बोहायड्रेट्स, फायटोन्यूट्रिएंट्स आणि कॅल्शियमने समृद्ध आहे. यात कॅलरीज कमी आहेत, परंतु त्यात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे सी, ए, ई आणि के सारखे पोषक असतात. याशिवाय त्यात लोह, पोटॅशियम, जस्त आणि फॉस्फरस सारखी खनिजे देखील असतात. कोणत्या समस्यांमध्ये ताडगोळा खाणे आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले आहे.

ताडगोळा का खावा

  • सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नसेल तर..

  • अॅसिडिटीमुळे अनेकदा डोकेदुखी होत असेल तर..

  • बद्धकोष्ठता आणि पोटात गच्च होत असेल तर..

  • टॅनिंगमुळे त्वचा काळी पडली असेल तर..

  • त्वचेवर खाज आणि पुरळ उठण्याची समस्या असेल तर..

बद्धकोष्ठता आणि आम्लता उपचार

उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन बी-12 असते, ते खाल्ल्याने पोटातील ऍसिडिटी दूर होते. तसेच, ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकते. यामध्ये फायबर देखील असते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते.

त्वचेवर पुरळ उठणे

उन्हाळ्यात त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत ताडगोळा खाल्ल्याने आराम मिळेल. यामुळे जळजळ आणि खाज दूर होईल. याशिवाय हे खाल्ल्याने उन्हाळ्यात चेहरा उजळतो. हे फ्री-रॅडिकल्सच्या प्रभावापासून त्वचेचे संरक्षण करते. त्यात व्हिटॅमिन-सी असते, जे कोलेजन (त्वचेचा पोत राखते) उत्पादन वाढवते.

शरीर हायड्रेटेड राहते

उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते, त्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी कमी होऊ लागते. ताडगोळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला डिहायड्रेट होऊ देत नाही.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा

ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. उन्हाळ्यात हे खाल्ल्याने शरीर रोग आणि संक्रमणाशी सहज लढू शकते.

ताडगोळा पोटासाठी फायदेशीर आहे

नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष देऊनही उन्हाळ्यात फुगण्याची समस्या तुम्हाला सतावत असेल, तर ताडगोळा तुमच्यासाठी सर्वोत्तम फळ ठरू शकतो.

डोकेदुखी निघून जाते

डोकेदुखी ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे उन्हाळ्यात बहुतेक लोकांना त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळेही ही समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत खजूर उपयुक्त ठरू शकतो. त्यात कूलिंग गुणधर्म आणि फायबर आहेत. या उन्हाळ्यात तुम्ही अजून ताडगोळा खाल्ला नाही का, मग आजच करून पहा. ते बाजारात सहज उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT