Benefits of Ration Card Sakal
लाइफस्टाइल

मोफत अन्नधान्याव्यतिरिक्त 'रेशन कार्ड'चे अनेक फायदे; असा करा अर्ज

Ration Card Benefits : मोफत अन्नधान्याव्यतिरिक्त रेशन कार्ड हा वैध ओळखपत्र आणि रहिवास पुरावा मानला जातो

सकाळ डिजिटल टीम

रेशनकार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज (How to Apply Online for Ration Card?):

तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, तर तुम्हाला ओळख (Identity) आणि रहिवासी पुरावा (Residential Proof) म्हणून शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड (Ration Card) वापरता येते. वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) बनवण्यासाठीदेखील हा वैध पुरावा (Valid Proof) मानला जातो. शिधापत्रिका असल्यास एलपीजी कनेक्शन मिळणे सोपे होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून (Government) सर्व शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला मोफत धान्य (Free Grains on Ration Card) दिले जात आहे. सध्या देशात सुमारे 80 कोटी लोक याचा लाभ घेत आहेत. शिधापत्रिकेचे फायदे एवढ्यापुरतेच मर्यादित नसून इतरही अनेक कामे सुलभ करतात.

आता सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड’ (One Nation, One Ration Card) लागू केले आहे. या बदलानंतर तुम्ही देशात कुठेही कोणत्याही राज्याच्या शिधापत्रिकेचा लाभ घेऊ शकता. ते बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि ऑनलाइन अर्ज घरी बसून करता येतो

रेशन कार्ड हा वैध ओळखपत्र आणि रहिवास पुरावा (Ration card is a valid identity card and proof of residency)-

रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यापूर्वी, त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. शिधापत्रिकेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ओळखपत्र आणि पत्ता पुरावा या दोन्ही रूपात वापरले जाऊ शकते. अनेक उद्देशांसाठी वैध आयडी आणि पत्ता पुरावा म्हणून रेशनकार्ड उपयोगात आणता येतं. रेशनकार्डच्या माध्यमातून तुम्हाला मोफत अन्नधान्याव्यतिरिक्त, अनुदानावर अन्नपदार्थ आणि इंधन (Fuel) खरेदी करू शकता.

शिधापत्रिकेसाठी घरबसल्या ऑनलाईन असा करा अर्ज (Apply online for ration card)-

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अन्न, पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या (Department of Food, Supplies and Consumer Affairs) वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

यानंतर, सर्वप्रथम, NFSA 2013 अर्ज भरावा लागेल.

आता तुम्हाला ओळख आणि वास्तव्याचा पुरावा द्यावा लागेल.

ओळख पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट वापरता येईल. आधार कार्ड, एलपीजी कनेक्शन, वीज बिल, टेलिफोन बिल, भाडे करार वैध पत्त्याचा पुरावा मानला जातो.

याशिवाय, तुम्हाला उत्पन्नाची हमी, कास्ट प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वत: चा पत्ता असलेले पोस्टकार्ड देखील सादर करावे लागेल.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, फी भरताच तुमचे काम पूर्ण होते.

यानंतर, सरकारी अधिकारी तुमची पात्रता तपासतील आणि दिलेल्या माहितीची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.

पडताळणीमध्ये सर्व माहिती बरोबर आढळल्यास, येत्या काही दिवसांत शिधापत्रिका तुमच्या पत्त्यावर पाठवली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT