Benefits Of Sprouts esakal
लाइफस्टाइल

Benefits Of Sprouts : सकाळी मुठभर खा हा पदार्थ , आयुष्यभर हृदय विकार राहील चार हात लांब!

रक्ताची पातळी वाढवण्याचा सोप्पा उपाय

Pooja Karande-Kadam

 Benefits Of Sprouts : पुर्वीच्या काळात लोक मोड आलेले कडधान्य, डाळी, पालेभाज्य यांचे सेवन करत होते. त्यामुळे ते दिर्घायुषी होते. पण, नंतरच्या काळात नाश्त्याला सॅन्डविच अन् दुपारच्या जेवणाला, सायंकाळच्यावेळी पिझ्झा बर्गर यांनी या पौष्टीक पदार्थांची जागा घेतली. त्याचे साईड इफेक्टही व्हायला लागले. तरीही आजही लोकांची जीवनशैली बदललेली नाही.

जे आरोग्याची जास्त काळजी घेतात. जे वर्कआउट करतात त्यांनी मात्र या धान्यांचे महत्त्व जाणले आहे. अंकुरलेले धान्य म्हणजे शुध्द पूर्ण पौष्टिक अन्न आहे. मूग, हरभरा, ज्वारी, बाजरी ही संपूर्ण धान्ये रात्री भिजवून सकाळी कांदा, मीठ आणि टोमॅटो मिसळून खावीत. Weightloss

कडधान्य तुमच्या पोटाला आधार देतात. तुम्हाला सतत भूक नाही लागत. त्यामुळे तुम्ही लिमिटेड खाता आणि तुमचं आरोग्यही नियंत्रणात राहतं. Benefits Of Sprouts : consume sprouts every morning fill blood veins reduce heart disease risk

कडधान्य इतके प्रभावशाली आहेत की, त्यातील सर्व पोषक तत्व शरीराला पूर्णपणे उपलब्ध असतात. स्प्राउट्समध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे पोषक असतात. कडधान्य सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादींनी परिपूर्ण असतात.

स्प्राउट्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्प्राउट्समध्ये कोणतेही केमिकल मिसळले जात नाही. किंवा ते इतर कोणत्याही वस्तूसह शिजवले जात नाही, ज्यामुळे पोषक घटकांची रचना बदलते. म्हणूनच अंकुर हा शुद्ध नैसर्गिक आहार आहे.

तज्ज्ञांच्या मते, मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते जे आपली पचनक्रीया सुरळीत करते. अंकुरलेल्या धान्यांमध्ये अशी अनेक एन्झाइम्स आढळतात ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. हे एन्झाईम अन्न पचवण्यामध्ये आणि त्यातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यामध्ये खूप वेगाने काम करतात.

अंकुरित धान्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी असते, त्यामुळे त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूपच कमी असते. स्प्राउट्समध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. स्प्राउट्स भूक संप्रेरक घरेलिन संतुलित करण्यास मदत करतात.

यामुळेच कोवळे मोड खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. उर्जा पातळी शाबूत राहिली तरी. अशा प्रकारे, स्प्राउट्स लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

कोंब रक्तासाठी सर्वात फायदेशीर आहे

कडधान्याला आलेले मोड हे रक्तातील लाल रक्तपेशी म्हणजेच RBC आणि पांढऱ्या रक्त पेशी म्हणजेच WBC च्या निर्मितीला गती देते. यामुळे रक्ताभिसरणही सुरळीत राहते. RBC च्या जास्तीमुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीराचे अवयव निरोगी राहतात.

स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्प्राउट्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स पुरेशा प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल एलडीएलचे प्रमाण कमी होते.

याशिवाय यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होऊ देत नाही. यामुळेच भिजवलेली कडधान्य हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करतात.

स्प्राउट्समध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे अंकुरांचे सेवन केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. यासोबतच ते त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढवते ज्यामुळे त्वचा चमकते. स्प्राउट्समध्ये असलेले व्हिटॅमिन ए केसांच्या फॉलिकल्सला सक्रिय करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT