आपली स्वतःची एक कार असावी असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मात्र कार घ्यायची म्हटलं तर मोठी रक्कम जवळ हवी. वाढत्या महागाईत गाडी घ्यायची म्हटलं तर १० लाख रुपये तरी खर्च येणार असा आपला समज होतो. मात्र जर तुम्हाला कमीत कमी किंमतीत कार घ्यायची असेल तर आता तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. Best Cars Under Seven Lacks Automobile News in Marathi
सध्या बाजारामध्ये आॅटोमोबाईल सेक्टरमध्ये Automobile Sector सात लाख रुपये किमतीच्या चांगल्या कारचा Cars पर्याय उपलब्ध आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी तसंच निसान सारख्या कंपन्यांच्या काही कारचा पर्याय तुमच्यासाठी आता उपलब्ध झाला आहे. तुमचं बजेट सात लाख रुपये असेल तर तुमच्यासाठी कोणत्या कारचा पर्याय उपलब्ध आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Cars under 7 lacks
1. टाटा अल्ट्रोज- टाटा कंपनीने टाटा अल्ट्रोज हा एक चांगला पर्याय भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. तोही त्यांच्या खिशाला परवडेल असा. टाटाच्या या सब कॉम्पॅक्ट कारच्या बेसिक मॉडेलची किंमत ६.३५ एवढी आहे. अल्ट्रोज या हॅचबॅक कार मध्ये 23 किलोमीटर प्रति लिटर एवढं मायलेज मिळतं. टाटा मोटर्सच्या या मॉडेलची इंजिन क्षमता 1199 ते 1497 सीसी एवढी आहे. Tata Altroz
2. Wagon R- गेल्या २४ वर्षात भारतीय बाजारात या कारला कोणीही टक्कर देऊ शकलेलं नाही. तुमच्या छोट्याश्या कुटुंबासाठी तुम्हाला एक छानशी गाडी हवी असेल तर वॅगन आर हा अगदी उत्तम पर्याय आहे. या गाडीची किंमत ५.५३ लाखांपासून सुरू होते. वॅगन आर ला १.२ लिटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. ही गाडी २० पेक्षा जास्त मायलेज देते.
3. मॅगनाईट- तर सात लाख रुपयांच्या बजेटमध्ये निसान कंपनीच्या मॅगनाईट या गाडीचा ही पर्याय उपलब्ध आहे. निसान कंपनीची ही गाडी एक एसयूव्ही कार असून या कारची किंमत पाच लाख 97 हजार पासून सुरु होते. ही गाडी १८-२० किलोमीटर प्रति लिटर एवढा मायलेज देते. निसान मॅगनाईटला ९९९ सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे.
हे देखिल वाचा-
४. मारुती सुझुकी सेलेरिओ – मारुती सुझुकीची सेलेरिओ ही कार ४ वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत महाराष्ट्रात साधारण ६.३५ लाखांपासून ते ७.७३ पर्यंत ऑनरोड आहे. तर ही गाडी साधारण २५.१२ ते ३५ किलोमीटर पर्यंतच मायलेज देते. सेरेरिओ ९९८ सीसी इंजिन देण्यात आलं आहे. ही ५ सीटर गाडी पेट्रोल आणि CNG अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. maruti suzuki celerio
५. Swift- मारुती सुझीकीच्या लोकप्रिय गाड्यांच्या लिस्टमध्ये असलेली स्विफ्ट हा देखील हे चांगला पर्याय आहे. चांगलं मायलेज देणाऱ्या कार्सच्या लिस्टमध्ये मारुतीची ही हॅचबॅक कार चांगलीच लोकप्रिय आहे. या गाडीतही डिझायरमधील इंजन देण्यात आलं आहे. ही कार २२ किमी प्रती लिटर मायलेज देते. तर स्विफ्टची किंमत ही ५.९९ लाखांपासून सुरू होते.
6. मारुती सिझुकी डिझायर- तर मारुतीची डिझायर हा पर्याय देखील तुम्हाला सात लाखांपर्यंत उपलब्ध आहे. मारुती सुझुकी डिझायर ही पाच सीटर सेडान कार फॅमिली कार म्हणून एक चांगला पर्याय आहे. डिझायरचं बेसिक मॉडेल सहा लाख 24 हजारांपर्यंत उपलब्ध आहे. मारुती सुझुकी डिजायर ही जवळपास 23 ते 31 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते.
७. अल्टो के १० Alto k10- चांगला मायलेज देणाऱ्या बजेट कारमध्ये मारुती सुझुकीच्या कारचा बोलबाला पाहायला मिळतो. या कंपनीची आणखी एक बजेट कार म्हणजे अल्टो के १० Alto K10. ही कार १.० पेट्रोल इंजिनमध्ये येते. ही कार २४.३९ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. या गाडीची ऑनरोड किंमत ही ४.७२ लाखांपासून ६.९३ लाखांपर्यंत आहे.
८. रेनॉल्ट क्विड Renault Kwid- रेनॉल्टची भारतातील ही एन्ट्री लेव्हल कार आहे. ५ सीटर असलेल्या या कारची किंमत ऑनरोड ५.५३ लाखांपासून सुरू होते. या कारला ९९९ सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. तर ही कार २१.५४ ते २२ किमी प्रतिलीटर मायलेज देते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
हे देखिल वाचा-
9. ह्युंदाई ग्रॅण्ड आय१० Hyundai grand i10- ह्युंदाईच्या या कारची किंमत ऑनरोड ६.८० लाखांपासून सुरू होते. या कारला ११९७ सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. पेट्रोल आणि CNG असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
या बजेट कारचे पर्याय निवडून तुम्ही तुमच्या गाडीचं स्वप्न पूर्ण करू शकता. गाडी घेण्यापूर्वी नक्की गाडी घेण्याचा उद्देश काय याचा विचार करून गाडी निवडल्यास अधिक सोयीचं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.