How to Look Younger: तरुण दिसायला कुणाला आवडतं नाही. जसं जसं वय वाढतं जातं तसं तसं आपल्या शरीरासोबतच आपल्या चेहऱ्यावरी वाढतं वय दिसू लागतं. हे वाढतं वय लपवण्यासाठी खास करून महिलावर्ग Women खूपच प्रयत्नशील असतो.
वय वाढत गेलं की चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. चेहऱ्यावरील त्वचेची Skin चमक कमी होवून चेहरा निस्तेज दिसू लागतो. यासाठीच काही महिला त्याचं स्किन केअर रुटीन Skin care routine खुपच गांभिर्याने घेतात. Best multivitamin for Fifty plus age women to stay fit and healthy
नियमितपणे वेगवेगळया क्रिम, मास्क आणि सिरम लावून त्वचेची काळजी कशी घेता येईल यासाठी त्या धडपड करताना दिसतात. मात्र केवळ क्रिम आणि सीरम लावल्याने निरोगी आणि तरुण दिसणारी त्वचा मिळवणं शक्य होत नाही. त्यासाठी पुरेसे विटामिन्स असलेला आहार घेणं जास्त महत्वाचं आहे.
Vitamins for young Skin
हे देखिल वाचा-
चांगल्या त्वचेसाठी उत्तम आहार घेणं गरजेचं आहे हे अनेक डॉक्टर्स सांगत असतात. मात्र याकडे आपण कायम दूर्लक्ष करतो. परिणामी वयाची पन्नाशी उलटली की विटामिन्सची कमतरता निर्माण झाल्याने शरीर तर कुमकुवत होतच शिवाय चेहऱ्यावरही सुरकुत्या येऊन आपण निस्तेज दिसू लागतो.
यासाठी आपल्या डाएमध्ये काही विटामिन्सचा समावेश असणं गरजेचं आहे. ज्यामुळे वय ५० वर्ष झालं तरी त्वचा चमकदार आणि तरुण दिसेल.
विटामिन B12- विटामिन बी 12 हा एनर्जीचा मोठा स्त्रोत आहे. मात्र वय वाढत गेलं की शरिरात विटामिन बी 12ची कमतरता जाणवू लागते. दूध, डेअरी प्रोडक्ट, चिकन, मासे, अंड, मांस यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास विटामिन बी 12 ची कमतरता भरली जावू शकते. vitamin b12 source
विटामिन डी Vitamin D- ड जीवनसत्वाचा सगळ्यात महत्वाचा आणि नैसर्गिक स्त्रोत म्हणजे सुर्यप्रकाश. मात्र जर तुम्ही जास्तवेळ सुर्यप्रकाशात राहिलात तर सनबर्न होवू शकत. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारत विटामिन D असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता.
अन्नामध्ये मासे, डेअरी प्रोडक्ट आणि अंडी हे ड जीवनसत्वाचे मुख्य स्त्रोत आहेत. महिलांसाठी विटामिन D अत्यंत गरजेच आहे. विटामिन D हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत. त्याचसोबत नैराथ्य, चिंता आणि थकवा दूर करण्यासही मदत होते. Vitamin D Rich food
विटामिन बी 6- गाजर, पालक, केळी, दूध, चिकन आणि काळे तीळ यातून विटामिन बी 6 मुबलक प्रमाणात मिळतं. वयाच्या ५० वर्षांनंतर विटामिन बी 6ची पातळी घसरू लागते.
हे देखिल वाचा-
विटामिन सी Vitamin C – सौंदर्याचा विचार करताना सगळ्यात महत्वाचं विटामिन म्हणजे विटामिन C. क जीवनसत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे अँटीऑक्सिडंट त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतं. या जीवनसत्वामुळे त्वचेच प्रदूषण आणि UV रेष म्हणदेच विषारी किरणांपासूनही संरक्षण होतं.
विटामीन C मुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. त्वचा हायड्रट ठेवून ती बिघडण्यापासून बचाव होते. Keep skin hydrate. आंबट फळं जसं की संत्री, मोसंबी, लिंबू, बेरीज, किवी अशा फळांमध्ये क जीवनसत्तांच प्रमाण भरपूर असतं.
विटामिन इ Vitamin E- विटामिन इमधील अँटीऑक्सिडन्टमुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेमध्ये कोलेजन निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा तरुण दिसते. इ जीवनसत्वामुले सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेच संरक्षण होण्यास मदत होते. शरिरात इ जीवनसत्वाचं प्रमाण खुपच कमी झाल्यास तुम्ही कमी वयातच वृद्ध दिसू शकता.
त्यामुळे आहारात विटामिन E असणं गरजेचं आहे.
विटामिन ए- अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तुम्हाला सुरकुत्या आणि पिंपल्सचा सामना करावा लागू शकतो. विटामिन A मध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ते सुरकत्या, पुरळ कमी करून त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतं. गाजर, भोपळा आणि रताळं अशा प्रकारच्या भाज्यांचा आहारात समावेश करणं यासाठी गरजेचं आहे.
आहारात या विटामिन्ससोबतच महिलांनी पुरेसं कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा समावेश करणंही तितकंच गरजेचं आहे. एकंदरच पोषक आहार हाच तुमच्या तरुण दिसण्यासाठी महत्वाचा घटक आहे.
अलिकडे बाजारामध्येही विटामिन्स असलेल्या अनेक पिल्स किंवा ड्रिंक्स उपलब्ध आहेत. मात्र आहारामध्ये कधीही या विटामिनचा समावेश करणं हा योग्य पर्याय आहे. पुरेश्या भाज्या, फळ खाल्याने त्वचेसह संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहण्यास आवश्यक पोषण मिळतं.
टीप- हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. कुठलीही औषधे घेण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय सल्लागाराचा सल्ला आवर्जून घ्यावा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.