लाइफस्टाइल

Video Sharing Apps : फक्त इन्स्टाग्रामच नाही, तर 'या' अ‍ॅप्समधूनही करु शकता बक्कळ कमाई! पाहा संपूर्ण यादी

इंस्टाग्राम व्यतिरिक्त, तुम्ही या ॲप्समधून देखील चांगले पैसे कमावू शकता.

Aishwarya Musale

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनासाठीच नाही तर कमाईचाही एक पर्याय आहे. तुम्ही लोकांना शॉर्ट व्हिडिओ बनवताना आणि यूट्यूब आणि इन्स्टावर शेअर करताना पाहिले असेल. तुम्हाला व्हिडीओ बनवण्यात रस असेल आणि युजर्ससमोर काही खास कंटेंट सादर करू शकत असाल तर तुम्ही त्यातून पैसेही कमवू शकता. पण, इन्स्टाग्राम हे यासाठी एकमेव प्लॅटफॉर्म नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, या डिजिटल युगात आणखीही अनेक ॲप्स आहेत जे तुमची कमाई वाढवण्यात मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्या ॲप्सबद्दल.

Likee ॲप

हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. व्हिडिओ शेअरिंग ॲपच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मोठी रक्कम कमावण्याची संधी मिळू शकते. Likee ॲपमध्ये, तुम्हाला व्ह्यूजच्या आधारावर क्राउन दिला जातो, ज्याला तुम्ही रुपयात कन्व्हर्ट करून पैसे कमवू शकता. व्हिडिओ बनवताना, त्यातील कंटेंट नवीन आणि यूनीक ठेवणे खूप महत्वाचे आहे.

मोज ॲप

YouTube-Instagram प्रमाणे या ॲपवरही तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. याशिवाय तुम्ही लाइव्ह येऊन लोकांशीही कनेक्ट होऊ शकता. युनिक कंटेंटसह चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ अपलोड करून तुम्ही त्यातून मासिक कमाई देखील करू शकता. Moj ॲपची खास गोष्ट अशी आहे की ते तुम्हाला कोलॅबरेशनची सुविधा देते आणि तुम्ही त्यासोबत एफिलिएट मार्केटिंग देखील करू शकता.

Kwai ॲप

हे ॲप तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर मिळेल. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवले जातात, त्याच पद्धतीने Kwai ॲपही काम करते. या ॲपवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर, जेवढे व्ह्यूज वाढतील त्यानुसार तुम्हाला कॉइन्स मिळतील. तुम्ही हे कॉइन्स डॉलर किंवा रुपयात बदलू शकता. मात्र यासाठी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ बनवावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT