bhagyashri bandiwar sakal
लाइफस्टाइल

‘चविष्ट’ आणि उपयुक्त चर्चांचे व्यासपीठ

मी मुळची नागपूरची (विदर्भ) असल्यामुळे मला विदर्भातील विविध पारंपारिक पदार्थ बनवण्याची पहिल्यापासूनच आवड होती.

सकाळ वृत्तसेवा

- भाग्यश्री बंडीवार, संस्थापक, रुचिरा आणि सौंदर्य ग्रुप

मी मुळची नागपूरची (विदर्भ) असल्यामुळे मला विदर्भातील विविध पारंपारिक पदार्थ बनवण्याची पहिल्यापासूनच आवड होती. त्यादरम्यान मी फेसबुकवर साधारण २०१६ मध्ये बरेच असे ग्रुप पाहिले होते, की ज्यावर पश्चिम महाराष्ट्रातील बरेच पदार्थ व त्यांच्या बनविण्याच्या पद्धती सांगितल्या तसेच शेअर केल्या जायच्या. त्यामुळे त्यांचा विस्तार होण्यास मदत व्हायची.

लोकांना नवनवीन पदार्थांची चव घ्यायला आवडत असतात; पण त्यावेळी माझ्या असे निदर्शनास आले, की विदर्भातील पदार्थांची माहिती देणारा असा एकही ग्रुप फेसबुकवर नाहीये. त्यातून मी अशा प्रकारचा एक नवीन प्लॅटफार्म फेसबुकच्या माध्यमातून २०१६ मध्ये सुरू केला. सुरुवातीला शंभर, हजार करता करता आजपर्यंत फेसबुकवर ‘रुचिरा आणि सौंदर्य’ या ग्रुपमध्ये एक लाख पंचवीस हजार महिला जोडल्या गेल्या आहेत.

गेल्या सात वर्षांपासून मी या ग्रुपची ॲडमिन म्हणून काम बघते. हा ग्रुप महिलांसाठी बनविलेला असून ग्रुपच्या माध्यमातून सखींना हेल्थ, ब्युटी, रेसिपी, आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते. विचारांची देवाणघेवाण, ज्ञान देणे-घेणे, हा ग्रुपचा मुख्य उद्देश आहे.

सुरुवातीला फक्त विदर्भातील रेसिपीजवर या ग्रुपवर चर्चा व्हायची. हळूहळू सर्व सखी म्हणाल्या, की आपण इतरही विविध ठिकाणच्याही सर्व रेसिपीजची देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळे ते सुरू झाले. मी स्वतः योग प्रशिक्षक असून योगाचे ऑनलाइन क्लास घेते. त्याचबरोबर गेल्या सहा वर्षांपासून ज्योतिष मार्गदर्शन करत आहे आणि लॅक्मे सर्टिफाईड मेकअप आर्टिस्टही आहे.

या सर्व गोष्टींचा ग्रुपमधील महिलांना फायदा व्हावा यासाठी या विषयांवरील विविध पोस्ट; तसेच माहितीचे मार्गदर्शन करण्यास मी सुरुवात केली. सुरुवातीला ग्रुपमध्ये फक्त पदार्थांवर चर्चा व्हायची. त्यानंतर मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असल्याकारणाने मी वेगवेगळ्या छोट्या ब्युटी टिप्स ग्रुपवर टाकण्यास सुरुवात केली. त्याला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला, त्यांना ते आवडायला लागले. त्यातूनच त्यांची मागणी वाढली.

प्रत्येक स्त्री ही तिच्या घरासाठी निःस्वार्थ वृत्तीने काम करत असते. तिच्या स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवून घरातील सर्व मंडळींसाठी राबत असते. जसे, कोणताही उत्कृष्ट अन्नपदार्थ हा व्यक्तीच्या मनापर्यंत जाण्याचा मार्ग असतो. त्याच प्रकारे स्त्रीच्या सौंदर्यात आणखी भर पडावी यासाठी तिने आनंदी, प्रसन्न राहणे; तसेच तिच्या आवडीच्या गोष्टी करणे महत्त्वाचे असते.

आंतरिक आणि बाह्य सौंदर्यात भर घालण्यासाठी ‘रुचिरा आणि सौंदर्य’ ग्रुपवर अनेक चर्चा रंगत असतात. आजकालच्या युगात महिलांना घर आणि काम या दोन्हीही गोष्टी सांभाळाव्या लागतात. कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेबल राहण्यासाठी वेगवेगळ्या ब्यूटीटिप्स द्यायला सुरुवात केली. यातून त्याचा आत्मविश्वास वाढायला मदत होत होती.

ग्रुपमध्ये विविध सणांनिमित्त वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो; तसेच सहली, मेळाव्यांचे आयोजनही करत असतो. आमचे एकमेकींशी मैत्रीचे नाते तयार झाले आहे. कोणत्याही सदस्याला कोणती वैयक्तिक अडचण असेल, तर त्या माझ्याशी अथवा एकमेकांशी संवाद साधून ती सोडविण्याचा प्रयत्न करतात. एवढ्या वर्षात या ग्रुपचा झालेला विस्तार पाहून खरंच कुतूहल वाटते.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT