जर तुम्ही घरी बर्थ डे पार्टी कमी खर्चात करण्याचा विचार करत असाल तर काही स्वस्त आणि सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे घर सुंदर आणि आकर्षक दिसेल. चला तर मग जाणून घेऊया या सोप्या चिप्स कोणत्या आहेत.
फुग्यांचा वापर करा
घर रंगीत फुग्यांनी सजवू शकता. तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे फुगे खरेदी करून तुमच्या घराच्या भिंती, दरवाजे किंवा खिडक्या सजवू शकता. यामुळे तुमचे घर खूप सुंदर दिसेल आणि पार्टीचे वातावरणही तयार होईल. बर्थ डे पार्टी फुग्यांशिवाय अपुर्ण राहते.
लाइटिंग
बर्थ डे पार्टीसाठी घर सुंदर सजवण्यासाठी स्वस्त एलईडी दिवे किंवा फेरी लाइट्स वापरा. हे दिवे तुमच्या खोलीला एक खास वातावरण देतात. तुम्ही हे तुमच्या घराच्या खिडक्या, भिंतींवर किंवा पार्टी टेबलांभोवती ठेवू शकता. या लाइटिंगमुळे घराचे आकर्षण वाढेल.
थीमवर आधारित सजावट
तुम्ही पार्टीसाठी विशिष्ट थीम ठेवत असाल तर त्यानुसार सजावट करू शकता. समजा तुमच्या पार्टीची थीम सुपरहिरो असेल तर तुम्ही त्यानुसार सजावट करू शकता.
टेबल डेकोरेशन
पार्टीसाठी टेबल सजवण्यासाठी टेबलावर एक सुंदर कापड पसरवा आणि त्यावर काही फुले किंवा मेणबत्त्या ठेऊ शकता. ही सजावट साधी असली तरी घर अधिक सुंदर दिसेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.