Black Plastic Side Effects esakal
लाइफस्टाइल

Black Plastic Side Effects : काळ्या प्लास्टिक बॉक्समधले अन्न विषाप्रमाणेच; यामुळे होऊ शकतो कर्करोग!

काळे प्लास्टिक घातक ठरू शकते

Pooja Karande-Kadam

Black Plastic Side Effects : रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये काळ्या प्लास्टिकच्या बॉक्सचा वापर अन्न देण्यासाठी किंवा पॅक करण्यासाठी केला जातो. काही काळापासून त्याचा ट्रेंड झपाट्याने वाढू लागला आहे. खूप कमी लोकांना हे माहित असेल की ज्या बॉक्समध्ये तुम्ही स्वादिष्ट अन्नाचा आस्वाद घेत आहात, ते अन्न तुमच्यासाठी विषासारखेच आहे.

या धावपळीच्या जीवनात आजकाल लोक अशा अनेक गोष्टींचा वापर करू लागले आहेत, ज्यामुळे त्यांचे काम सोपे झाले आहे. अशा वेळी वेळ वाचवण्यासाठी आपण अशा अनेक गोष्टींना आपल्या जीवनशैलीचा भाग बनवतो, मग ते आपल्यासाठी हानिकारक ठरते.

प्लास्टिक हे त्यापैकी एक आहे. आजकाल प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, याच्या सततच्या वापरामुळे आपल्या पर्यावरणाचे खूप नुकसान होत आहे, हेही खरे आहे. एवढेच नाही तर यामुळे आपल्या आरोग्यालाही खूप त्रास होतो. ( Plastic is equal to poison)

आता अलीकडेच प्लास्टिकबाबत आणखी एक धक्कादायक अभ्यास समोर आला आहे, जो तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, हा अभ्यास रेस्टॉरंटमध्ये किंवा खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्‍या काळ्या प्लास्टिकशी संबंधित आहे.

आजकाल काळ्या रंगाचे प्लास्टिकचे बॉक्स रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स इत्यादींमध्ये खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वापरले जातात. मात्र, हा बॉक्स तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. कसे ते जाणून घेऊया-

अनेकवेळा अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केलिकल्स वापरले जातात. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. आपण प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक केलेले अन्न खाणे टाळले पाहिजे. तसेच, पाणी पिण्यासाठी तांबे, स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर केला पाहिजे. (Health Tips)

काळे प्लास्टिक घातक ठरू शकते

सामान्यतः खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचे बॉक्स, प्लास्टिकच्या रेजिन्समध्ये कार्बन ब्लॅक रंगद्रव्ये जोडून बनवले जातात. हे रंगद्रव्य प्लास्टिकला काळा रंग देण्याचे काम करते. अशा स्थितीत जेव्हा आपण या डब्यात अन्न वगैरे खातो तेव्हा त्यातील रसायनांचे काही कण आपल्या अन्नामध्ये मिसळतात.

अन्नासोबत आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे नंतर आपले नुकसान होते. या प्लास्टिकच्या डब्यात जास्त गरम अन्न ठेवल्यास किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून अन्न गरम केल्यास त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. (Cancer)

काळे प्लास्टिक हानिकारक का आहे?

एका संशोधनात असे समोर आले आहे की, काळ्या प्लास्टिकमध्ये कार्बन ब्लॅक रंगद्रव्य असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' (IARC) ने कार्बन ब्लॅक प्लॅस्टिकमध्ये पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAH) ची उपस्थिती कॅन्सरचा धोका मानली आहे.

इतकंच नाही तर श्वसनाचा त्रासही होऊ शकतो. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे या ब्लॅक बॉक्समधील अन्न खातात तर आजच तुमची सवय बदला. (Plastic Waste)

काळ्या प्लास्टिकमुळे कर्करोग कसा होतो?

काळ्या प्लास्टिकमध्ये अनेक घातक रसायने आढळतात. यातील एक घातक रसायन 'एंडोक्राइन डिस्ट्रिझिंग' हे आपल्यासाठी विषासारखे आहे, कारण ते आपल्या शरीरात जाऊन हार्मोन्सचे संतुलन बिघडवते.

यामुळे, हार्मोन्स त्यांचे कार्य योग्यरित्या करू शकत नाहीत. अशावेळी त्याचा दीर्घकाळ वापर केल्याने त्यातील रसायने कर्करोगाचे कारण बनतात. आश्‍चर्याची बाब म्हणजे हे धोकादायक रसायने प्लास्टिकमध्ये आधीच अस्तित्वात नसतात. तर कोणताही गरम पदार्थ या डब्यात ठेवल्याने होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT