Abs Workout At Home: सगळ्यांनाच आपण छान दिसावं, आपलं शरीर सुद्धा सुडौल आणि आकर्षक असावं असं वाटतं असतं. यासाठी अनेक लोकं अनेक पर्याय निवडतात जसे की योगासने, हेव्ही वर्कआऊट, जिम Gym, डाएट आणि असे बरेच. body builders sharp abs exercises personal trainer recommended discover
अनेकांना बॉडी बिल्डिंगची Body Building हौस असते त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे abs; Abs बनवण्याचे फायदे खूप आहेत. फक्त आपली पर्सनालिटी छान दिसते असं नाही याशिवाय याने आपले शरीर सुद्धा मजबूत बनते.
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्नायूंना बळकट बनवणे. पण अनेकदा abs बनवण्यात लोकांना हवं तितकं यश येत नाही.
बॉडीबिल्डर्सचे ऍब्स दिसायला खूप आकर्षक असतात. बघता क्षणीच आपल्याला असे abs बनवण्याचा मोह आवरत नाही. पण हे असेच बनत नाही त्यासाठी विशेष प्रकारचे व्यायाम आहेत.
पण बाहेर जाऊन जिम मध्ये वर्कआऊट करण्यासाठी मुबलक वेळ आणि पैसा दोन्हीही सगळ्यांकडे असतच असं नाही. बॉडी बिल्डिंग साठी एक रूटीन आहे जे फॉलो केले तर तुम्हीही घरच्याघरी abs बनवू शकतात.
याबद्दलची माहिती पर्सनल फिटनेस ट्रेनर आशिष मिश्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केली आहे. महत्वाचे म्हणजे हे व्यायाम स्त्री आणि पुरुष दोघेही करु शकतात.
१. हँगिंग लेग रेझ
- हा abs व्यायाम करण्यासाठी एक काठी गरजेची आहे जिच्यावर तुम्ही लटकू शकाल.
- आता आपल्या दोन्ही खांद्याच्या समान अंतरावर धरून लटका.
- आता पोटाचे स्नायू घट्ट करा आणि दोन्ही पाय एकत्र वर उचला.
- आपल्या पायाचे पंजे पोटपर्यंत वर आणा आणि परत खाली न्या. अस करत रहा.
- थकवा येईपर्यंत तुम्हाला एक सेट करावा लागेल आणि असे 3 सेट करावे लागतील.
२. हँगिंग साइड लेग रेज
- हा व्यायाम देखील हँगिंग लेग रेजसारखाच आहे.
- यामध्ये लटकल्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यापासून दुमडून घ्या. आता पंजे सुद्धा एकत्र जोडून घ्या
- आता कंबतेतून उजव्या बाजूने वाकून पाय बाजूकडून पोटापर्यंत आणा.
- ही कृती तुम्हाला 20 वेळा करायची आहे आणि याचे 3 सेट करा.
- नंतर हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूनेही करा.
हे देखिल वाचा-
३. डिक्लाईन क्रंचेस
- हा व्यायाम करण्यासाठी डिक्लाइन बेंचवर झोपा.
- आता पाय ताठ करा आणि मुख्य स्नायू घट्ट करा.
- यानंतर मान व पाठ न वाकवता कंबरेवरून उठा.
- पोट मांड्यापर्यंत आणा आणि मग परत जा.
- थकवा येईपर्यंत तुम्हाला असे 3 सेट करावे लागतील.
एबीएस वर्कआउटमध्ये असा श्वास घ्या
व्यायामादरम्यान तुम्ही श्वास कसा घेत आहात हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमचे पोटाचे स्नायू आकुंचन पावतात तेव्हा तुम्हाला श्वास सोडावा लागतो. हे अधिक परिणाम देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.