Christmas Outfit Ideas  
लाइफस्टाइल

Christmas Outfit Ideas : ख्रिसमस पार्टीला स्टायलीश लूक करायचा आहे? मग, अभिनेत्रींच्या 'या' रेड आऊटफीट्सपासून घ्या प्रेरणा

रेड कलरमध्ये पार्टीवेअर कपड्यांचे असंख्य ऑप्शन्स आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Christmas Outfit Ideas : अवघ्या २ दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र ख्रिसमसची लगबग पहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने खास पार्टीचे आयोजन केले जाते. आजकाल ऑफिसमध्य देखील खास पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीमध्ये मग खास रेड कलरची थीम ठेवली जाते.

रेड कलरमध्ये खरं तर पार्टीवेअर कपड्यांचे असंख्य ऑप्शन्स आहेत. तरूणींसाठी तर यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. वनपीस, को-ऑर्ड सेट्स, लॉंग गाऊन इत्यादी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आज आम्ही तुम्हाला खास बॉलिवूड अभिनेत्रींचे ख्रिसमस पार्टीसाठीचे रेड आऊटफीट लूक्स दाखवणार आहोत. या लूक्सपासून तुम्ही नक्कीच आयडियाज घेऊ शकता.

शिल्पाचा स्कर्ट विद जॅकेट लूक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कोणत्याही आऊटफीटमध्ये बेस्टच दिसते. तिचे इंडो-वेस्टर्न लूक्स जास्त लक्ष वेधून घेतात. तिने परिधान केलेला हा आऊटफीट ख्रिसमस पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे.

ब्रालेट किंवा रेड क्रॉप टॉपसोबत तुम्ही रेड स्कर्ट मॅचिंग करू शकता. तुम्ही यावर जॅकेट ही ट्राय करू शकता. ज्याप्रमाणे आता शिल्पाने या आऊटफीटवर ट्राय केले आहे. ख्रिसमस पार्टीला काहीतरी वेगळे दिसायचे असेल तर शिल्पाचा हा इंडो-वेस्टर्न लूक नक्की ट्राय करा.

आलियाचा रेड डीप नेक ड्रेस

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने परिधान केलेला हा रेड डीप नेक ड्रेस ख्रिसमस पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही आलियाप्रमाणे अशा प्रकारचा आऊटफीट नक्की ट्राय करू शकता.

यावर तुम्ही ओव्हरकोट किंवा जॅकेट ही ट्राय करू शकता. यामुळे, तुमच्या लूकमध्ये आणखी भर पडेल, यात काही शंका नाही. यावर मिनिमल मेकअप केला की तुमचा लूक पार्टीसाठी रेडी आहे अस समजा.

किआराचा रेड स्ट्रॅपलेस ड्रेस

बॉलिवूड अभिनेत्री किआरा अडवाणी तिच्या फॅशन सेन्ससाठी खास करून ओळखली जाते. वेस्टर्नवेअर म्हणू नका की काही ट्रॅडिशनल ती प्रत्येक प्रकारच्या आऊटफीटमध्ये तितकीच सुंदर दिसते.

किआराचा हा रेड स्ट्रॅपलेस ड्रेस ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही नक्कीच निवडू शकता. तिच्यासारखा हा स्ट्रॅपलेस ड्रेस किंवा रेड मॅक्सी ड्रेस पार्टीमध्ये उठून दिसेल यात काही शंका नाही. मात्र, सध्या प्रचंड थंडी आहे. त्यामुळे, या स्ट्रॅपलेस ड्रेसवर तुम्ही शॉर्ट जॅकेट किंवा ओव्हरसाईज कोट देखील परिधान करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT