Republic Day Fashion : अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. प्रजासत्ताक दिन आपल्या देशात फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्त शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना एका खास पोशाखाची गरज भासते. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक महिला तिरंगा थीम बेस्ड किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना अधिक प्राधान्य देताना दिसतात. जर तुम्हाला यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काही वेगळा लूक करायचा असेल तर त्यासाठी काही फॅशन टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
खास प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढऱ्या ड्रेससाठीच्या आयडियाज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. यासाठी आपण बॉलिवूड अभिनेत्रींच्या व्हाईट ड्रेस लूकपासून देखील प्रेरणा घेऊ शकतो.
प्रजासत्ताक दिनाला जर तुम्हाला काही वेगळा लूक करायचा असेल तर तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या या लूकपासून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. माधुरी या व्हाईट स्लिवलेस ड्रेसमध्ये एलिगंट दिसत आहे.
माधुरीचा हा पांढरा ड्रेस एलिगंट आणि पारंपारिक आहे. तुम्ही पांढऱ्या स्लिवलेस ड्रेसवर मोकळे केस आणि खड्यांचे किंवा कुंदनचे कानातले घालून तुमचा लूक आणखी सुंदर बनवू शकता. थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही या ड्रेसवर जॅकेट देखील घालू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने परिधान केलेला या व्हाईट चिकनकारी अनारकली ड्रेसपासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. या प्रकारचा सूट हा प्रजासत्ताकदिनासाठी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनासाठी काही वेगळा व्हाईट लूक करायचा असेल तर त्यासाठी जेनेलियाच्या या अनारकली ड्रेसपासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.
या अनारकली ड्रेसवर सुंदर पद्धतीने चिकनकारी वर्क केलेले असून यावरील दुपट्टा देखील लक्ष वेधून घेत आहे. या प्रकारचा व्हाईट चिकनकारी अनारकली ड्रेस तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. या ड्रेसवर तुम्ही मोकळ्या केसांची हेअरस्टाईल आणि सुंदर कानातले घालून तुमचा लूक पूर्ण करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.