Bone Health : बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष करतो. आहाराकडेही आपलं विशेष लक्ष नसतं. आहार पौष्टिक नसेल तर शरीर कमकुवत होऊ लागते आणि लहानसहान कामात आपल्याला थकवा येतो. हाडे कमकुवत झाल्यास तुम्हाला या समस्या उद्भवता. तेव्हा हाडे कमकुवत होण्यामागे तुमच्या कोणत्या चुकीच्या सवयी जबाबदार आहेत ते आपण जाणून घेऊया.
आपल्या रोजच्या जीवनात आपण स्वत:ला नकळत अशा काही वाइट सवयी लावून घेतो ज्याची आपल्याला कल्पना नसते पण त्याचे दुष्परिणाम आपल्या हाडांवर दिसून येतात. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून शरीर मजबूत करता येते. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरघुती उपाय सांगणार आहोत.
जर तुम्ही बॉडी अॅक्टिव्हिटी कमी करत असाल किंवा जास्त आळशी असाल तर ते हाडे कमकुवत होण्याचे हे एक प्रमुख कारण ठरते. चालण्याबरोबरच थोडा व्यायाम करत राहणेसुद्धा आरोग्यासाठी चांगले असते, अन्यथा त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
खारट खाण्याची सवय
जर तुम्हाला जेवणात वरून मीठ घेण्याची किंवा जास्त प्रमाणात मीठ खाण्याची सवय असेल तर ही सवय तुमची हाडे कमकुवत करण्यास जबाबदार ठरू शकते. मिठात सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे शरीरातून कॅल्शियम कमी होऊ लागते, हाडांच्या मजबुतीसाठी हा पोषक घटक असतो. (calcium)
पुरेशी झोप न घेणे
पुरेशी झोप न झाल्यास हाडे कमकुवत होतात, आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 7 ते 8 तास झोप न घेतल्यास कमकुवत हाडांसह इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. धुम्रपानाचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे, पण त्यामुळे हाडेही कमकुवत होतात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. (Bone Health)
शहरामध्ये राहाणारे बहुतांश लोक फ्लॅटमध्ये राहातात, जिथे सूर्यप्रकाश पुरेसा पोहोचत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात पोहोचत नाही, त्यामुळे हाडे कमकुवत होतात. मुलांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला नाही तर रिकेट्ससारखे आजार होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.