लाइफस्टाइल

Uric acid : यूरिक ॲसिड झपाट्याने नियंत्रणात आणेल ‘या’ भाजीचा रस; जाणून घ्या

यूरिक ॲसिड झपाट्याने नियंत्रणात आणेल ‘या’ कडू भाजीचा रस

Aishwarya Musale

युरिक अ‍ॅसिड ही सध्याच्या युगातील एक सामान्य समस्या बनली आहे, ज्यासाठी खराब आहाराच्या सवयी आणि खराब जीवनशैली कारणीभूत ठरू शकते. यामुळे सांधेदुखी आणि पायांना सूज येते. मात्र, तुम्ही आहारात थोडासा बदल केल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. तुमच्या रोजच्या आहारात दुधी भोपळ्याच्या ज्यूसचा समावेश करा, त्याचा प्रभाव काही दिवसात दिसून येईल.

दुधी भोपळ्याच्या ज्यूसमुळे युरिक अ‍ॅसिड कंट्रोलमध्ये राहते. एवढेच नव्हे तर सांधेदुखी कमी करण्यासाठी देखील या ज्यूसचा फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही रोज एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस प्यायला तर तुमच्या शरीरात जमा झालेले युरिक ॲसिड लघवीच्या मदतीने बाहेर येऊ शकते.

वजन कमी होईल

सध्याच्या युगात वजन वाढणे ही एक मोठी समस्या बनली आहे, अशा परिस्थितीत दुधी भोपळ्याचा रस तुमच्या कंबरेची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करू शकतो, कारण या भाजीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे.

​कमी कोलेस्ट्रॉल

जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, तेव्हा उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस नियमित प्या.

दुधी भोपळ्याचा रस पिण्याचे फायदे

दुधी भोपळ्याचा रस नियमितपणे प्यायल्याने तुमचे केस लवकर पांढरे होण्यापासून वाचू शकतात.

फक्त एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस तुमच्या केसांना दीर्घकाळ काळे आणि चमकदार ठेवण्यास मदत करू शकतो.

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस हा चांगला पर्याय आहे. तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच ते शरीराला थंड ठेवण्यासही मदत करू शकते.

हा रस मेंदूच्या कार्यासाठीही खूप चांगला आहे. याने ताणतणावही दूर होऊ शकतो. दुधी भोपळ्याचा रस मधुमेही रुग्णांसाठीही खूप चांगला आहे.

दुधीचा ज्यूस प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT