breakup day esakal
लाइफस्टाइल

Breakup Day : ब्रेकअप, नैराश्य आणि मितवा!

ब्रेकअपनंतर येणाऱ्या डिप्रेशनमध्ये स्वत:च स्वत:चे मितवा बना!

सकाळ डिजिटल टीम


क्षितिज आणि प्रिया एक टिपिकल कपल. सगळेच राहतात तस ते ही काही वर्षे एकत्र होते. अगदी सगळ्यांच्यात होत तसच त्यांच्यातही भांडण व्हायचं. पण कोणीतरी माघार घेतली की ते मिटून जायच. प्रेम, विश्वास आपुलकी हे सगळं होत. पण त्याच बरोबर वाद ही होताच.

म्हटलं तर क्षणात तुटल असत हे नातं. पण, दोघांनाही एकमेकांची गरज होती म्हणूनच कदाचित आजवर ते नात टिकून होत. त्यांच्या नात्यात कधीही गॅप पडला नाही. सकाळी वाद तर सायंकाळी एकत्र असेच ते दोघे होते.

सुरुवातीचे काही दिवस नात नवं होत. नव्याचे नऊ दिवस चांगले अगदी मजेत एकमेकांना समजून घेण्यात घेणे. एकमेकांना काय आवडतं, काय नाही याची काळजी घेतली गेली. क्षितिज आणि प्रियाला एकत्र आणण्यात मित्रांनी मदत केली होती. पण नन्तर हेच मित्र दूर गेले. त्यांना जेव्हा गरज होती तेव्हाच ते दुरावले.

यामुळे यांच्या नात्यावर असा परिणाम झाला की, वाद झाले तर समजून सांगायला, चूक दाखवून द्यायला, कान पकडायला कोणीच नव्हतं. यामुळे या दोघांपैकी एकाने नात संपवण्याचा निर्णय घेतला.

म्हणतात ना निर्णय घेणे सोपं पण तो निभावणं आणि त्यावर टिकून राहण अवघड. अगदी तसंच इगो म्हणा किंवा रागातून घेतलेला निर्णय क्षितिजला त्रास देणारा ठरला. प्रिया मात्र पुढे निघून गेली. पण तो तिथेच होता आजही. तिच्या आठवणीत त्याला आता गरज होती मित्र, मैत्रीण, आई बहीण वडील या कोणत्याही रुपात असलेला एका कौंसलरची. एका मितवाची.

कौंसलींग असत तरी काय. एखाद्या नैराश्येत गेलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढणे आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवणे म्हणजेच कौंसलिंग होय. जेव्हा क्षितिज आणि प्रिया यांच्या नात्याला खरी गरज होती कोणाच्या तरी समजावण्याची. तेव्हा ते समजावणं जमलं नाही.

म्हणूनच तर ते वेगळे झाले. मित्र मैत्रिणी आपुलकीची भावना ठेवून विचारपूस करतात. काही चुकलं असेल तर मार्गदर्शन करतात. तुम्ही निराशावादी झाला तर त्यातून बाहेर काढतात. म्हणून खरे मित्र नक्की हवेत.

काही टेन्शन असल्याने तुमची झोप उडते. जेवण वेळेवर नसत. जेवलो तरीही ते अपूर्णच. याचा परिणाम थेट तुमच्या मनावर आणि शरीरावर होतो. वजन वाढत किंवा खूप कमी होत. यासाठी आधी टेन्शन दूर करून जेवण आणि झोप याच्या वेळा ठरवा. मानसोपचार तज्ञ हेच सांगतात. कोणताही नकारात्मक विचार न करता जे होईल ते स्वीकारा आणि सगळ्यांना तोंड द्या.

कधीतरी मूड जाणं, अपसेट वाटणं किंवा एकाकी वाटणं हा प्रकार सगळ्यांच्याच आयुष्यात होत असतो. परंतु एकाकीपणा किंवा दुःखी मनःस्थिती सगळ्या आयुष्याचाच ताबा घेत असेल. दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असतील आणि हे चक्र बराच काळ चालले असेल तर आपण डिप्रेशनच्या आजाराचे बळी असू शकाल. या आजारात असणारे दडपण, अस्वस्थता यांची तीव्रता नेहमीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आणि जास्त काळ राहणारी असते.

यावर उपचार म्हणून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घेता येण्याजोगी औषधे तुम्ही घेऊ शकता. आणि डिप्रेशनच्या उपचारामध्ये औषधाबरोबरच मानसोपचार थेरपी तुमच्या कामी येऊ शकतात. याच बरोबर, सकारात्मक विचारसरणी, भरपूर व्यायाम, पौष्टिक अन्न आणि तुमचे आवडते छंदच तुम्हाला यातून बाहेर पडायला नक्की मदत करतील.

काही प्रॉब्लम असेल तर कोणाशीतरी नक्की शेअर करा. त्यामुळे तुमच मन हलकं होईल. मनाला उगीच अडगळीची खोली बनवू नका. तुमचं मन मुक्तछंद गार्डन आहे असेच समजा.एखादी व्यक्ती सोडून गेली म्हणून आयुष्य थांबत नाही. ऊन पाऊस आहे तसं येणं जाणं होत राहील.

आपण नेमकं काय जिव्हारी लावून घ्यायचं हे आपल्याच हातात आहे. खरंच एकदा स्वतःचे मानसोपचार तज्ञ व्हा. कोणीच नसेल सोबत तर एकटे समजवा स्वतःला. काही लोक इतरांचं ऐकतात आणि स्वतःच खर करतात. अशी म्हणं ही आहे ना.

'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे'  अगदी तसंच या बाबतीत करून बघा. जग म्हणतं म्हणून नको तर स्वतःच ऐकून निराशेतुन बाहेर या. स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्काच्या माणसासाठी. कारण कोणी थांबावं आणि कोणी जाव हे आपल्या हातात नसत. पण जो थांबतो त्याला आपलंस करा. स्वत:च स्वत:चे मितवा व्हा,आयुष्य जगणं सोप्प होईल.

पूजा कदम-कारंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT