Buddha Purnima Sakal
लाइफस्टाइल

Buddha Purnima : घरात भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवताय? पण जागा चुकवू नका! नाहीतर...

वास्तूशास्त्रामध्ये या विषयीचे नियम सांगितले आहेत.

वैष्णवी कारंजकर

आज (५ मे) बुद्धपौर्णिमा आहे. अनेक जण गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित असतात. बऱ्याचदा घरामध्ये बुद्धांची मूर्ती किंवा फोटोही ठेवलेली असते. त्याविषयीच आज काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे.

घरात कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात, याचे नियम वास्तूशास्त्राने सांगितलेले आहे. पण घरामध्ये चुकीच्या दिशेला काही वस्तू ठेवल्याने नकारात्मक उर्जा निर्माण होते. कौटुंबिक आयुष्यात, प्रगतीमध्येही अडचणी येतात. अशा परिस्थितीत तुम्ही भगवान बुद्धांची प्रतिमा घरात ठेवू शकता. पण त्यासाठीही योग्य जागा निवडणं गरजेचं आहे.

घराचा मुख्य दरवाजा

वास्तूशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दारासमोर बसलेल्या बुद्धांची प्रतिमा ठेवावी. त्यामुळे वाईट गोष्टींपासून आपण दूर राहतो. शिवाय ही प्रतिमा दारासमोर जमिनीपासून ४ फूट उंचीवर ठेवावी. यामुळे शत्रूंचा त्रास कमी होण्यास मदत होते.

हॉल/लिव्हिंग रुम

लिव्हिंग रुममध्ये उजव्या बाजूला प्रतिमा ठेवावी व त्या मूर्तीचं तोंड पश्मिमेकडे असावं. एखादा टेबल किंवा स्टूलवर ही मूर्ती ठेवता येऊ शकते. त्यामुळे मानसिक शांती, समृद्धीचा लाभ होतो.

देव्हारा

देव्हाऱ्यामध्ये बुद्धांची मूर्ती ठेवल्याने पूजा करताना मन एकाग्र राहतं. ही मूर्ती ठेवताना तिचं तोंड पूर्वेकडे असावं. मूर्ती एवढ्या उंचीवर असावी की ती आपल्या डोळ्यांसमोर येईल. कमी उंचीच्या ठिकाणी बुद्धांची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं.

लहान मुलांची खोली

लहान मुलांच्या खोलीत बुद्धांची प्रतिमा ठेवताना तिचं तोंड पूर्वेकडे असावं. विश्राम मुद्रेतले भगवान बुद्ध मुलांच्या खोलीत ठेवल्याने मुलांचं लक्ष अभ्यासात केंद्रित होतं.

बाग

बागेतही तुम्ही भगवान बुद्धांची मूर्ती ठेवू शकता. यामुळे बागेत फिरताना मानसिक शांतताही मिळते. शिवाय डिप्रेशन कमी करण्यासही मदत होते.

(सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही माहितीची पुष्टी अथवा समर्थन करत नाही. कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT