Business Idea esakal
लाइफस्टाइल

Business Idea : बापलेकाची भन्नाट बिझनेस आयडीया,प्लास्टिक वेस्टपासून बनवले ब्रँडेड कपडे, खरेदीसाठी लागलीय रीघ!

ही कंपनी दररोज १५ लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करते

Pooja Karande-Kadam

Business Idea : प्लास्टिक वेस्ट हा सध्याचा ट्रेंडिग विषय आहे. दररोज लाखो प्लास्टिकच्या बाटल्या, बॉक्स, प्लेट्स, पिशव्या, प्लास्टिकची पाकीटे करचा म्हणून उदयास येत आहेत. या कचऱ्याचं नियोजन कसं करावं, हा प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांनाही पडलेला आहे.

या प्लास्टिक वेस्टचा वापर करून कोणी काही बनवलं तर ते केवळ शोभेची वस्तूच असेल असे तुम्हाला वाटेल. पण,तसं नाहीय, एका बापलेकाच्या जोडीनं प्लास्टिकचा वापर करून चक्क ब्रँडेड कपडे बनवले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. 

तामिळनाडूचे के. शंकर आणि सेंथिल शंकर प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून जॅकेट, ब्लेझर, टी-शर्ट आणि बॉटम बनवत आहेत. यासह, ते दररोज सुमारे 15 लाख प्लास्टिकच्या बाटल्या लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवत आहेत.

प्लास्टिक वेस्टच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तामिळनाडूच्या के. शंकर आणि सेंथिल शंकर यांचे योगदान विशेष आहे. ते श्री रेंगा पॉलिमर्स या त्यांच्या कंपनीत दररोज १५ लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करतात. या बाटल्या वापरल्यानंतर सहसा लँडफिलमध्ये संपतात. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक उत्तम मार्ग शोधला आहे.

या बाटल्यांपासून तो त्याच्या कंपनीत फॅशनेबल कपडे बनवत आहे. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर शंकर यांनी अनेक वर्षे परदेशात नोकरी केली. २००८ मध्ये ते भारतात परतले आणि प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर काम करू लागले. त्यांनी श्रीरंगा पॉलिमर्स नावाची कंपनी सुरू केली जी औद्योगिक कचऱ्यापासून कार्पेट बनवत होते.

अनेक वर्षांपासून त्यांनी या पद्धतीने प्लास्टिकचा पुनर्वापर केला. आता त्यांचा मुलगा सेंथिल शंकर एक पाऊल पुढे जात आहे आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे शाश्वत फॅशनमध्ये रूपांतर करत आहे. सेंथिलने २०२१ मध्ये इकोलाइन नावाचा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे.

यामध्ये तो देशभरातील कचरा गोळा करणाऱ्या ५०हजार लोकांकडून प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून टी-शर्ट, पँट आणि ब्लेझरसारख्या वस्तू बनवत आहे. अशा प्रकारे, त्यांनी आतापर्यंत सुमारे ५० लाख प्लास्टिकच्या बाटल्या लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवल्या आहेत.

तो ८ प्लास्टिकच्या बाटल्या आणि सुमारे २० बाटल्या एक जॅकेट  बनवतो. त्याचा ब्रँड अधिक प्रसिद्ध झाला जेव्हा फेब्रुवारी २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शाश्वत ब्रँड इकोलाइनचा प्रचार करण्यासाठी संसदेत त्यांनी बनवलेले जॅकेट घातले होते.

२५ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून ते जॅकेट तयार करण्यात आले. पंतप्रधानांनी ते संसदेत तसेच जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये परिधान केले. सेंथिल म्हणतात, “आम्ही ज्या ब्रँडसाठी खूप मेहनत घेतली आहे त्या ब्रँडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली याचा आम्हाला खूप आनंद आहे.

त्या कार्यक्रमानंतर आमच्या उत्पादनांच्या विक्रीतही २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.” सध्या त्यांच्या उत्पादनांची किंमत ५०० ते ६,००० रुपये आहे. आज तो दरमहा २०,००० ऑर्डर्सद्वारे १२ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल कमवत आहे. त्यांना बहुतांश ऑर्डर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून मिळतात. तुम्हालाही हे टिकाऊ जॅकेट स्वतःसाठी विकत घ्यायचे असेल, तर तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT