Business Idea esakal
लाइफस्टाइल

Business Idea :  या तरूणानं प्लास्टिक वेस्टवर शोधलाय जबरी फंडा; चहा प्या आणि कप जणावरांना खायला घाला

या वस्तू वापरून झाल्यावर तुम्ही ते घरातील जनावरांना खायला घालू शकता

Pooja Karande-Kadam

Business Idea :  भारत सरकार स्वच्छतेसाठी जनजागृती करत आहे. त्यामुळेच आपल्याला जागोजागी कचरा कुंड्या आणि प्लास्टिक वेस्टबद्दलचे बोर्ड दिसत आहेत. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेऊनच एका तरूणाने एक जबरी फंडा शोधला आहे. यामुळे त्या तरूणाने कमी कालावधीतच जास्त फायदा मिळवून एक यशस्वी उद्योजकही बनला आहे.

या तरूणाचे नाव कोइंबतूर येथे राहणाऱ्या कल्याण कुमार यांनी प्लास्टीकला बगल देत एकदाच वापरली जाईल अशी वस्तू बनवायचे ठरवले. त्यासाठी त्यांच्या फॅक्टरीत एक अशी मशीन बनवली जी गव्हाचा कोंडा, धान्याचा भुस्सा, चिंच, शेंगांची फोलपाटे, केळ्याची साल, वेगवेगळ्या धान्याच्या बियांपासून उपयोगी वस्तू बनवत आहेत. (Business Idea : startup innovation ideas eco-friendly cutlery made with waste innovation)

कल्याणच्या या वस्तूंना बाजारात मागणी आहे. कारण, जे पर्यावरणासाठी थोडफार योगदान देऊ इच्छितात ते लोक कल्याणचेच प्रोडक्ट घेतात. कल्याणच्या या अनोख्या मशीनमध्ये इकोफ्रेंडली पदार्थांपासून चहाचे कप, प्लेट, चमचे, जेवणाची ताटे बनवली जातात.

आपल्याकडे जसं पत्रावळ्या असतात तशाच. पण कल्याणच्या या कामाचा प्लस पॉईंट असा आहे की, या वस्तू वापरून झाल्यावर तुम्ही ते घरातील जनावरांना खायला घालू शकता. (Business)

आता या वस्तूंपासून बनवलेले कप तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. ज्यांचा वापर झाला ते वापरलेले कप फेकून न देता गायींना चारा म्हणून दिले जातात. हे कप तुम्ही कचऱ्यात टाकले तरी त्याचा उपयोग खत म्हणूनही केला जाऊ शकतो. त्यामुळेच या कल्याणच्या या प्रोजेक्टचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वत:च्या या वेगळ्या कामाबद्दल कल्याण सांगतो की, वैयक्तीक कारणामुळे मला शिक्षण पुर्ण करता आलं नाही. मी BBA मध्येच सोडावं लागलं. त्यानंतर मी मिळेल ते काम करत वेगवेगळ्या मशिन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम केलं. त्यामुळे मला थोडफार नॉलेज आलं.

कल्याणची ही मशीन ३ लाखापासून ३५ लाखांपर्यंत आहे. कल्याण म्हणतो की, एका छोट्या मशीनमध्येही रोज १००० कप बनवण्याची क्षमता आहे. त्यासाठी तुम्हाला थोडफार लक्ष देत करावं लागतं. पण जी ३५ लाखाची मोठी मशीन आहे ती पुर्णपणे ऍटोमॅटीक आहे.(Business Idea)

आज मी स्वत: 10 लाख कप रोज विकतो. त्यामूळे मला मोठा फायदा होत आहे. मला या कामाचा प्रसार जगभर करायचा आहे. अनेक लोकांनी या कामाकडे यावे, त्यातून वेगळी रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे, असेही कल्याण म्हणतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT