Butter Milk Face Pack esakal
लाइफस्टाइल

Butter Milk Face Pack : चेहऱ्याला ताक लावून गोरं होता येतं; पहा ताकाचा आजवर कधीही न ऐकलेला फायदा!

म्ही ताक वापरून चेहऱ्यावरील काळे डाग देखील कमी करू शकता

Pooja Karande-Kadam

Butter Milk Facepack : आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. आयुर्वेदानुसार ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. वय वाढेल तस चेहऱ्यावरील चकचकीतपणा जातो. त्यामुळे तुमचा चेहरा खूपच कुरूप दिसू लागतो. अशा परिस्थितीत हे काळे डाग दूर करण्यासाठी अनेक सौंदर्य उत्पादने बाजारात सहज उपलब्ध आहेत.

ही उत्पादने महाग आहेत तसंच रसायनयुक्त आहेत. यासोबतच त्यांच्याकडून तुम्हाला हवा तसा परिणाम मिळत नाही. त्याच वेळी, तुम्हाला माहित आहे का की तुम्ही ताक वापरून चेहऱ्यावरील काळे डाग देखील कमी करू शकता? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी ताक फेस मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत.

केवळ दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’. ताक हे दही किंवा सायीपासून बनवल्या जाते. एक भाग दही आणि दोन भाग पाणी एकत्र करून, घुसळले असता त्यातून लोणी वेगळे होते आणि उरते ते ताक.

ताकामध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात जे तुमच्या त्वचेवर ब्लीचचे काम करतात. म्हणूनच, त्याच्या रोजच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारतो, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते. आजवर तुम्ही ताक पिण्याचे फायदे वाचले असतील. पण ताक चेहऱ्याला लावण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेता का? आज आपण याबद्दलच जाणून घेऊयात.

ताक पिण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का

  • ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

  • वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

  • दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

  • ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

  • ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

  • थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

  • रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

  • ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

  • लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

  • महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.

ताकाचा फेस मास्क बनवण्यासाठी आवश्यक साहित्य-

- ताक 1 टेबलस्पून

- लिंबाचा रस 5 थेंब

ताक फेस मास्क कसा वापरायचा?

  • ताक फेस मास्क बनवण्यासाठी, एका भांड्यात ठेवा.

  • नंतर त्यात लिंबाच्या रसाचे ५ थेंब टाकून चांगले मिसळा.

  • यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या.

  • त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

  • यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतात.

  • यासोबतच तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही दिसू लागते.

  • पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रोज सकाळी 1 कप ताकाने तुमचा चेहरा देखील धुवू शकता.

  • यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होऊ लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT