PresVu Eye Drops Eye Care esakal
लाइफस्टाइल

Eye Care : काय खरंच प्रेस्वु आय ड्रॉप्स चष्मा दूर करतं? किंमत किती,कुणी वापरावं,वाचा एका क्लिकमध्ये..

Saisimran Ghashi

PresVu Eye Drop : आजच्या धावपळीच्या जगात डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळे डोळे लवकर थकतात आणि दृष्टी कमजोर होते. विशेषत: वाढत्या वयासोबत जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसणे कठीण होते. या समस्येसाठी अनेक लोक चष्मा वापरतात. मात्र, आता चष्म्याला बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, भारतातच विकसित झालेले एक नवीन आय ड्रॉप, प्रेस्वु, आपल्या डोळ्यांना तरुण आणि तेजस्वी बनवण्याचा दावा करत आहे,

प्रेस्वु आय ड्रॉप्स म्हणजे काय?

मुंबईतील अटोंड फार्मास्युटिकलने प्रेसबायोपिया (जवळचे दिसणे कठीण होणे) या समस्यावर उपाय म्हणून प्रेस्वु आय ड्रॉप्स विकसित केले आहेत. या ड्रॉप्समध्ये एक थेंब टाकल्याने सहा तासांपर्यंत चष्म्याची गरज भासणार नाही. हे ड्रॉप्स केवळ 15 मिनिटांत आपल्या डोळ्यांवर प्रभावीपणे कार्य करतात.

प्रेस्वु आय ड्रॉप्स इतके प्रभावी का आहेत?

प्रेस्वु आय ड्रॉप्स तयार करण्यासाठी प्रगत डायनॅमिक बफर तंत्रज्ञान वापरले आहे. या तंत्रज्ञानामुळे, थेंब डोळ्यांना अश्रूंच्या पीएचशी त्वरीत जुळवून घेण्यास मदत करतात.

प्रेस्वु आय ड्रॉप्स केवळ चष्मा दूर करण्यासाठीच नाही तर डोळ्यांतील कोरडेपणा दूर करण्यास देखील मदत करतात. या ड्रॉप्सची किंमत केवळ 350 रुपये आहे, ज्यामुळे ते सर्वसामान्यांना परवडणारे ठरेल.

हे ड्रॉप कसे कार्य करतात?

प्रेस्वु आय ड्रॉप्समध्ये पायलोकार्पिन नावाचा घटक असतो जो डोळ्यांची पेशी सक्रिय करून जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसण्यास मदत करतो.

वाढत्या वयासोबत जवळचे दिसणे कठीण होणारे लोक,मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळे थकणारे लोक आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा असणाऱ्या व्यक्तींना या ड्रॉपचा फायदा होऊ शकतो.

प्रेस्वु आय ड्रॉप्स हे चष्म्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. पण कोणत्याही नवीन औषधाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ड्रॉप्स वापरण्याच्या वेळी दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT