उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी एसी, फॅन आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारमधील एसी उन्हाळ्यात प्रवास सुखकर बनवण्यास मदत करतो. पण एसीचा स्पीड वाढवल्याने त्याचा कारच्या मायलेजवर परिणाम होऊ शकतो तसचे इंधन जास्त खर्च होऊ शकतो असे काही लोकांना वाटते. यामुळे अनेक लोक एसीचा स्पीड वाढवत नाही. पण खरच असे होते का? चला तर मग जाणून घेऊया सविस्तरपणे खरचं अस होत की नाही.
कारमधील एसी लावल्यास मायलेजवर परिणाम होतो का?
कारमधील अनेक फिचर इंजिनच्या मदतीने काम करतात. तसेच एसी देखील इंजिनवर आधारित असतो. कारमधील एसी इंजिनला जोडलेला असतो, ज्यामुळे कंप्रेसरला पॉवर मिळते आणि गाडी सुरळीत चालते.
कारमधील एसी वापरताना थेट इंधनचा वापर होतो. कारमध्ये एसी वापरल्याने मायलेजवर फरक पडतो हे यावरून समजते. पण यासोबतच हा प्रश्न देखील उपस्थित होतो की एसीच्या फॅनची स्पीड वाढवल्यास मायलेज वाढतो की कमी होतो?
एसीच्या पंख्याचा वेग वाढल्याने मायलेजवर परिणाम होईल का?
कारच्या एसीची यंत्रणा पूर्णपणे इंजिनला जोडलेली असते. पण एसीचा फॅन कारच्या बॅटरीशी जोडलेला असतो. एसीची हवा फक्त एसी पंख्याच्या मदतीने कारच्या आत पाठवली जाते. एसी फॅन बॅटरीला जोडला जातो म्हणजे तो इलेक्ट्रिकल सिस्टिमला जोडलेला असतो. म्हणजेच एसी फॅनचा इंजिनशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे तुम्ही कारचा एसी 1, 2 3 किंवा 4 वर चालवला तरी त्याचा मायलेजवर परिणाम होणार नाही किंवा एसीच्या पंख्याचा वेग वाढल्याने इंधन जास्त खर्च होणार नाही.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.