Car च्या विंडशिल्डची काळजी Esakal
लाइफस्टाइल

Car च्या सर्वात नाजूक पार्टची अशी घ्या काळजी नाहीतर बसेल मोठा फटका

Kirti Wadkar

Car खरेदी केल्यानंतर तिचा वेळोवेळी मेंटेनंन्स करणं देखील तितकचं गरजेचं आहे. कारची नियमितपणे योग्य काळजी न घेतल्यास कारमधील अनेक पार्ट लवकर निकामी होवून कारचं लाइफ कमी होतं. खास करून कारमधील काही भाग हे अत्यंत नाजूक असतात.

यापैकीच एक महत्वाचा भाग म्हणजे विंडशिल्ड Windshield. Car Care Tips How to protect windshield of your Vehicle

कारची समोरील विंडशिल्ड Car Windshield ही काचेची असल्याने तिची काळजी घेणं गरजेचं आहे. कारमधील विंडशिल्ड काचेची असल्याने तो कारमधील नाजूक पार्ट Car part समजला जातो. एखाद्या छोट्याश्या चुकीने देखील विंडशील्डला तडा जाऊ शकतो किंवा तिचं नुकसान होवू शकतं.

विंडशिल्ड खराब झाल्यास किंवा ती स्वच्छ नसल्यास चालकाला कार चालवताना Driving अडचणी येऊ शकतात. तसंच सुरक्षेच्यादृष्टीने Car Safety देखील ते घातक ठरू शकतं.

विंडशिल्डची काळजी घेणं गरजेचं

Car मधील विंडशिल्ड हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा भाग कार चालवताना समोरील मार्ग दिसण्यासाठी पारदर्शक काचेने तयार करण्यात आलेला असतो. त्यामुळे विंडशिल्डची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

ड्रायव्हिंग करताना योग्य अंतर राखा

कार चालवत असताना अनेकदा समोरील वाहनाच्या चाकामुळे एखादा मोठा खडा किंवा दगड आपल्या कारच्या विंडशिल्डवर आपटू शकतो. अत्यंत वेगाने आलेल्या या दगडामुळे विंडशिल्डला तडे जाऊ शकतात. यासाठीच कार ड्राइव्ह करत असताना समोरील वाहानापासून योग्य अंतर राखणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

झाडाखाली पार्किंग करणं टाळा

अनेकजण कार थंड रहावी यासाठी ती झाडाखाली पार्क करणं पसंत करतात. मात्र झाडाखाली कार पार्क करणं धोक्याचं ठरू शकतं. खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा वाऱ्याने झाडाची एखादी फांदी तुटून विंडशिल्डवरू पडू शकते. ज्यामुळे कारच्या विंडशिल्डसोबत कारच्या इतर पार्ट्सचं मोठं नुकसान होवू शकतं.

एसीचा वापर करताना घ्या काळजी

उन्हाळ्यामध्ये प्रवास करताना कार थंड रहावी यासाठी एसीचा वापर केला जातो. अनेकजण कारमध्ये थंड वाटावं यासाठी एसीचं कुलिंग जास्त ठेवतात. मात्र यामुळे विंडशिल्डचं नुकसान होवू शकतं. अशा स्थितीत विंडशिल्डला तडा जाण्याची शक्यता वाढते.

पार्किंगसाठी योग्य जागा महत्वाची

कार पार्क करत असताना कायम योग्य जागी पार्क करणं अत्यंत गरजेचं आहे. झाडाप्रमाणाचे बिल्डिंगची खिडकी किंवा बाल्कनीखाली देखील कार पार्क करणं कायम टाळावं. काही वेळेस खिडकी किंवा बाल्कनीतून कुंडी किंवा एखादी वस्तू विंडशिल्डवर पडण्याची शक्यता असते. ज्यामुळे विंडशिल्डला तडे जाऊ शकतात.

अशा प्रकारे कारच्या विंडशिल्डची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारच्या विंडशिल्डला तडे गेले असल्यास ती केव्हाही फुटण्याची शक्यता असते. शिवाय या विंडशिल्डला तडे गेल्यास तुम्हाला नवी विंडशिल्ड बसवायची असल्यास हजारोंचा फटका पडू शकतो.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT