Chaitra Navratri 2024 esakal
लाइफस्टाइल

Chaitra Navratri 2024 : आजपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात, जाणून घ्या मुहूर्त अन् घटस्थापनेचा विधी

नवरात्रीत कलशाची घटस्थापना नेहमी मुहूर्तावरच करावी

सकाळ डिजिटल टीम

Chaitra Navratri 2024 :

नवरात्री हा एक हिंदू सण आहे जो देवी दुर्गा आदिशक्तीच्या पूजेचा एक भाग आहे. आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चैत्र महिन्यातील नवरात्रीला सुरूवात झाली आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा सण संबंधित आहे. हे नऊ दिवस केवळ दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत.

शैलपुत्री,ब्रह्मचारिणी,चंद्रघंटा,कुष्मांडा,स्कंदमाता,कात्यायनी,कालरात्री,महागौरी,सिद्धिदात्री देवीच्या या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसात केली जाते. आणि शारदीय नवरात्रौत्सवात दहाव्या दिवशी रावण वध करून दसरा साजरा केला जातो. आजपासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊ.

घटस्थापनेचा मुहूर्त

नवरात्रीत कलशाची घटस्थापना नेहमी मुहूर्तावरच करावी. आज सकाळी 11:57 ते दुपारी 12:48 पर्यंत आहे. घटस्थापनेसाठी हा काळ शुभ आहे. या शुभ मुहूर्तावर माता शैलपुत्रीचीही पूजा करावी. (Chaitra Navratri 2024)

अशी करा घटस्थापना

  • गणेशाला नमस्कार करा.

  • मग जिथे घट स्थापन करायचा त्या जागोला नमस्कार करा.

  • तिथे पाट मांडा आणि त्यावर लाल कापड घालून पुन्हा नमस्कार करा.

  • कलशात शुद्धपाणी, गंगाजल, चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, हळकुंड, फूलं, दूर्वा, अक्षता, सुपारी आणि नाणं घाला.

  • आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवून झाका. आणि घट स्थापन करताना ओम नमश्चण्डिकायै हा मंत्र म्हणा.

नवरात्रीची पूजा दररोज अशी करा

  • प्रत्येक दिवशी स्वतःवर गंगाजल शिंपडा, कपाळावर कुंकू लावा, देवापुढे दिवा लावा.

  • रोज पहिले गणेशाची मग देवीची पूजा करावी.

  • रोज देवी लक्ष्मी, सरस्वती, कालिकेची पूजा करावी.

  • ही पूजा करताना देवीला कुंकू, हळद, मेंदी, फूलं, अत्तर वाहून पूजा करावी.

  • पूजा संपल्यावर नैवेद्य दाखवावा, त्यानंतर आरती करावी. मग प्रसाद वाटावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

६ बेड रूम, स्विमिंग पुल अन् बरंच काही! Rinku Singh च्या ३.५ कोटींच्या बंगल्याची करूया सफर, Video Viral

SCROLL FOR NEXT