लाइफस्टाइल

Chana Salad : फास्टफूडने वजन वाढतंय, हरभऱ्याच्या सॅलेडचा करा आहारात समावेश, वजन कमी व्हायला होईल मदत

Healthy Recipe : हरभऱ्यांमध्ये असलेले पोषक गुणधर्म आपली पचनसंस्था मजबूत बनवतात

सकाळ डिजिटल टीम

 Chana Salad :

आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक प्रोटीन्स अन् व्हिटामिन्स पावडर आणि औषधं उपलब्ध आहेत. पण अशा प्रोटीन्सचे साईड इफेक्टही आहेत. त्यामुळे आहारतज्ज्ञ अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. पण घरातील काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही वजन आरामात कमी करू शकता.  

घरातील पदार्थांत बरेचदा लोक हरभऱ्याचा विचार करतात. कारण, हरभरे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लोक वजन कमी करण्यासाठी हरभरे भिजवून खातात. तुम्हाला फक्त हरभरे खायचे नसतील तर तुम्ही हरभऱ्याचे सॅलेड बनवू शकता.  

हरभऱ्यांमध्ये असलेले पोषक गुणधर्म आपली पचनसंस्था मजबूत बनवतात. हरभऱ्यात व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक असतात. वजन कमी करणारे लोक याचा आहारात समावेश करतात. हरभऱ्यापासून बनलेले पदार्थ लोक आवडीने खातात. तुम्हाला हरभऱ्याचा नवा पदार्थ ट्राय करायचा असेल तर हरभऱ्याचे सॅलेड नक्की ट्राय करा.

हरभऱ्याचे सॅलेड कसे बनवायचे?

साहित्य :            

२ वाट्या हरभरे, १ मोठा टोमॅटो बिया काढून बारीक चिरून, २ पातीचे कांदे बारीक चिरून, १ लिंबाचा रस, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा सैंधव मीठ, चवीनुसार मीठ व मिरपूड, जिरेपूड (भाजून केलेल्या जिऱ्याची पूड), थोडी चिरलेली कोथिंबीर, साय काढलेल्या गाईच्या दुधाचे पनीर १०० ग्रॅम.

कृती :

  • हरभरे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात उकडून चाळणीवर निथळून घ्यावेत.

  • टोमॅटो चौकोनी बारीक चिरून घ्यावेत.

  • पातीचा कांदा पातीसकट बारीक चिरावा.

  • पनीर वापरायचे असेल तर हाताने थोडे फोडून घ्यावे.

  • बाऊलमध्ये उकडलेले सोलाणे, टोमॅटोच्या फोडी, पातीचा चिरलेला कांदा व पनीर एकत्र करावे.

  • त्यात मीठ, मिरपूड, चाट मसाला, सैंधव मीठ, लिंबाचा रस, जिरेपूड घालून हलक्या हाताने कालवून बाऊलमध्ये काढावे वरून थोडी कोथिंबीर घालावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT