Chanakya Niti for good relationship esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti: चाणक्यांच्या या गोष्टींवर विश्वास ठेवाल तर नातं सात जन्म टिकेल!

Chanakya Niti for good relationship: नातं टिकवण्यासाठीचे काही महत्त्वाचे नियम पाठ करून ठेवा

Pooja Karande-Kadam

Chanakya Niti for good relationship: कितीही मोठं कुटुंब असलं. त्यात अनेक जोडपी असली तरी एखादंच जोडपं असं असतं जे ‘राम मिलाई जोडी’ या कॅटेगरीत मोडतं. कारण, एकमेकांना समजून घेऊन संसार करणारे फार कमी पती-पत्नी आहेत. सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अविश्वास आणि विचारातील भिन्नता होय.

 चाणक्यचा जन्म सम्राट चंद्रगुप्त मौर्यच्या काळात झाला. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्याची म्हण आजही प्रासंगिक आहे. स्त्री-पुरुष संबंधांबाबतही त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

तूमच्या नात्यातही कलह, वाद होत असतील तर त्यातून बाहेर पडायला चाणक्य तूमची मदत करतील. पती-पत्नी,मित्र मैत्रिणी यांचे आदर्श नाते कसे असावे? याबद्दल चाणक्य यांनी काही सोपे नियम सांगितले आहेत. चला जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार घरातील स्त्री आणि पुरुषाचे नाते कसे असावे.

आचार्य चाणक्यांच्या मते पती-पत्नीचे नाते हे एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. त्यांचे आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण राहते. परंतु अनेकदा गैरसमज किंवा छोट्या-छोट्या कारणांमुळे पती-पत्नीच्या प्रेमाच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

आचार्य चाणक्य म्हणतात प्रेम किंवा वैवाहिक जीवनात दोघांनीही एकमेकांच्या सुखाची काळजी घेतली पाहिजे.  आयुष्यात अनेक वेळा पती-पत्नीला एकमेकांच्या आनंदासाठी आपल्या इच्छेचा त्याग करावा लागतो. अशा छोट्या त्यागांमध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनाचे यश दडलेले असते.

विश्वास

आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रेमाच्या नात्यात बांधलेल्या लोकांचा एकमेकांवर विश्वास असायला हवा. ते म्हणतात की ज्या नात्यात विश्वास असतो. आयुष्यात कितीही आव्हाने आली तरी ती जिंकण्यात यश मिळते.

विनम्रता

चाणक्यांच्या मते, प्रेमाच्या नात्यात कधीही गर्व आणि अहंकाराला स्थान नसावे. कारण यामुळे नात्यात खळबळ येण्याची शक्यता वाढते. नातेसंबंधांमध्ये नम्रता आवश्यक आहे.

स्वाभिमान

पतीने पत्नीचा स्वाभिमान दुखावू नये. कारण जिथे एकमेकांबद्दलचा आदर कमी होतो, तिथे नाते कमकुवत होऊ लागते. एकमेकांच्या स्वाभिमानाचे रक्षण करा.

वाईट शब्द

असे पती किंवा पत्नी जे नेहमी रागात असतात.सतत भांडत असतात. ते वाईट शब्द बोलतात आणि त्यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडते. अशा स्थितीत अशा लोकांना सोडणे योग्य आहे.

राग

पती-पत्नीमध्ये दोघांपैकी एकाचा स्वभाव रागाचा असेल तर कुटुंबात अस्वस्थता निर्माण होते. नातेसंबंधांमध्ये राग येऊ देऊ नका.

गुप्तता

वैवाहिक जीवनात आनंदासाठी पती-पत्नीमधील गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला कळू नयेत हे आवश्यक आहे. एकमेकांच्या चांगल्या गोष्टींवर चर्चा करणारे जोडपे नेहमी आनंदी असतात.

एकमेकांचे विचार ऐका

आचार्य चाणक्यांच्या मते कुठल्याही नातेसंबंधात अर्धे सत्य आणि अर्धे खोटे विषाप्रमाणे असतात. चाणक्यांच्या मते, जर तुम्हाला प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन सुखी तसेच आनंदी बनवायचे असेल तर या नात्याला मजबूत बनवण्यासाठी दोघांनी मिळून विचार करणे आणि येणाऱ्या अडचणींचा एकत्रितपणे विचार करणे महत्त्वाचे आहे,

प्रेम आणि समर्पण

प्रेम आणि समर्पण हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. चाणक्य म्हणतात की केवळ जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या सुखासाठी केलेल्या त्यागामुळे प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन यशस्वी होते. जे लोक नात्यात 'आम्ही' ही भावना ठेवतात, ते नातं चांगल्या प्रकारे सांभाळतात.

जोडीदारावर निर्णय लादू नका

विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. नात्यात विश्वास नसेल तर ते जास्त काळ टिकू शकत नाही. चाणक्य सांगतात की, घर आणि कामाची जबाबदारी समसमान वाटून घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नगण्य ठरते. एकमेकांना मदत करणारे जोडपे नेहमी आनंदी असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT