मतदार यादीतून नावे वगळलेल्यांना पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्र. सहा भरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एका शहर-जिल्ह्यातील व्यक्ती दुसऱ्या शहर, जिल्ह्यात (नवीन मतदारसंघ) राहायला गेला असल्यास त्यांनाही मतदार यादीतील पत्ता बदलता येतो. पण, त्यासाठी त्यांना ‘वोटर हेल्पलाइन’वर जाऊन फॉर्म क्र. आठ भरणे आवश्यक आहे तर पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक सहा भरा.
लोकसभा निवडणुकी वेळी मराठवाड्यासह राज्यातील अनेक मतदारसंघांतील शेकडो मतदारांना स्वत:कडे मतदान कार्ड असतानाही मतदान करता आलेले नाही. चूक कोणाची याचा तपास होईलच, पण त्या मतदारांना पुन्हा यादीत समाविष्ट होण्यासाठी फॉर्म नं. सहा भरून द्यावा लागणार आहे. ते मतदार आतादेखील ‘वोटर हेल्पलाइन’वर अर्ज करू शकतात. त्यावरील निर्णय मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होईल. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्याच्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी नावे वगळलेल्यांसह नवीन मतदारांना (१८ वर्षे पूर्ण झालेले) नावे नोंदवावी लागणार आहेत.
नवमतदारांना कधीही नाव नोंदविण्याची सोय
विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पण, नवमतदारांना कधीही नाव नोंदविण्याची सोय निवडणूक आयोगाच्या ॲप किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लोकसभेचा अनुभव पाहता आता सर्वच बीएलओंना पारदर्शकपणे काम करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतदेखील मतदारांची नावे वगळल्याच्या तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.
आवश्यक कागदपत्रे जोडून करा अर्ज
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, यादीतून नाव वगळले असल्यास पुन्हा समाविष्ट करणे, पत्ता बदलणे, नावात दुरुस्ती करण्याची सोय निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर केलेली आहे. पण, त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागतो.
एखादी व्यक्ती कामानिमित्त किंवा शिक्षण, नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात किंवा नवीन मतदारसंघात राहायला गेली असल्यास त्यांना त्याठिकाणी मतदान करता येते. पण, त्यासाठी त्या मतदाराला बदललेला पत्ता म्हणजेच रहिवासी पुरावा जोडून ‘वोटर हेल्पलाइन’वर फॉर्म क्रमांक आठ भरून देणे आवश्यक आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणत्याही कागदपत्रांची गरज पडत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.