happy father's day sakal
लाइफस्टाइल

Father's Dayच्या दिवशी बाबांना या गोष्टी देऊन करा खूश…

तुम्ही तुमच्या वडिलांना या भेटवस्तू देऊन हा दिवस अविस्मरणीय बनवू शकता

सकाळ डिजिटल टीम

आपल्या लेकरांच्या आयुष्यात सुखाचे चांदणे नांदावे म्हणून बापाने अनेक रात्री काळ्याकुट्ट अंधारात घालवलेल्या असतात. त्यामुळे आपल्या बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे.

फादर्स डे चा आनंद वेगळाच असतो. हा दिवस प्रत्येक मुलांमुलीकरता आणि वडिलांकरीता खूप खास असतो. हा दिवस तुमच्या वडिलांसाठी अधिक खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना कोणतीही भेटवस्तू देऊ शकता, परंतु भेट अशी असावी की तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि चमक येईल.

या लेखात आम्ही तुम्हाला फादर्स डेसाठी काही गिफ्ट आयडिया सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या वडिलांना देऊन त्यांचा हा दिवस अविस्मरणीय बनवू शकता. प्रत्येकांच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्वाचे स्थान असते. आईशिवाय आपण एक क्षणही जगू शकत नसलो तरी वडिलांशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं.

वडील आपले संपूर्ण आयुष्य मुलांवर अर्पण करतात आणि त्या बदल्यात काहीही मागत नाहीत. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यात घालवले जाते. अशाप्रकारे, मुलांचीही जबाबदारी बनते की त्यांनी त्यांच्या वडिलांना विशेष वाटावे आणि त्यांना सांगावे की त्यांची मुले देखील त्यांच्यासाठी फुल नाही पण फुलांची पाकळी काहीतरी करू शकतात.

आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' ही उत्तम संधी असते.19 जून म्हणजेच रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर दिलखुलास गप्पा मारा. बाप कठोर असतो त्यांच्याविषयी मनात धाक असतो. त्यामुळे मग आपण आणि बाबा हे समिकरण जुळायला वेळ लागतो. पण तुम्ही हे समिकरण जुळवून आणा मग तुम्हाला प्रेमळ बाप आपोआप दिसू लागेल.

तुम्ही हा फादर्स डे तुमच्या कुटुंबासोबत साजरा करू शकता पण तुमच्या वडिलांसाठी भेटवस्तू घ्यायला विसरू नका. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही भेटवस्तू सांगत आहोत, ज्या आपण आपल्या वडिलांना देऊ शकतो.

1) कॉफीचा कप

प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक मग असतो ज्यामध्ये ते चहा किंवा कॉफी पितात. वडिलांनाही अशा गोष्टी आवडतात पण लेकरांच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या नादात बाप आपल्या आवडी विसरून जातो.

या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडिलांना वडिलांवर लिहिलेल्या कोट असलेला कप किंवा फोटो कप त्यांना भेट देऊ शकता.

2) टी-शर्ट

जर तुम्ही फादर्स डेच्या दिवशी कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या वडिलांसाठी टी-शर्ट नक्कीच खरेदी करा. तुम्ही हा टी-शर्ट त्यांच्या आवडत्या रंगाचा देखील विकत घेऊ शकता किंवा तुम्ही एक टी-शर्ट खरेदी करू शकता ज्यावर पप्पासाठी जबरी असा कोट लिहिलेला आहे.

3) बुट

तुम्ही तुमच्या वडिलांकरता एखादा ब्रँडेड बुट खरेदी करु शकता. कारण लेकरांला सगळं भारी देण्याच्या नादात बाप चांगल्या गोष्टी वापरणं सोडुन देतो. किती तडजोडीच असत ना बापाच आयुष्.य म्हणून तुम्ही त्यांना बुट देऊन खूश करू शकता.

4) वॉच(हातातले घडयाळ)

जरी आपल्या हातात मोबाईल असला तरी आपल्या वडिलांच्या पिढीतल्या अनेकांना हातात घडयाळ बांधायची सवय असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांना आवडेल अशी घडयाळ सुध्दा देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT