Chicken Rate Hike : सर्व डाळ, तांदूळ, मसाल्याच्या पाठोपाठ आता चिकनाचे भाव वाढल्याने पोळ्याच्या पाडव्यासाठी आता मासांहारी खवय्यांना अधिकचा खिसा हलका करावा लागणार आहे. कारण चिकनच्या दरात प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांची वाढ झालेली आहे. श्रावण महिन्यात मागणी कमी होत चिकनच्या दरात घसरण अपेक्षित होती.
मात्र, यंदा इतिहासात पहिल्यांदाच श्रावणात चिकनची मागणी वाढली आहे. दोन महिन्यापूर्वी ठोक बाजारात ६० रुपये किलो असलेला जिवंत कोंबडीचा दर आता ११५ रुपयांवर पोचली आहे. किरकोळ बाजारात चिकनचा दर २०० त २२० रुपये दर आहे.
सण, उत्सवाच्या साधारणतः ६० दिवसांपूर्वी ‘हॅच हॉलिडे पाळण्यावर भर असतो. परिणामी यंदा श्रावणात चिकनची मागणी आणि पुरवठा यात तफावत राहिली. त्यामुळे दर तेजीत आले आहेत. कच्चा मालाचे दर कमी असले तरी यंदा उत्पादकांकडून बर्डची खरेदी करून त्यांची वाढ केली नाही. त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात चिकनची टंचाई निर्माण झालेली आहे. परिणामी, पुढील सहा महिन्यांत ही टंचाई राहणार असल्याने होळीलाही अधिकच्या दरातच चिकनची खरेदी करावी लागणार आहे, असे पोल्ट्री उत्पादकांचे म्हणणे आहे.
श्रावण महिन्यात यंदा प्रथमच कोंबडीच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. उत्पादन घटल्याने ही भाववाढ झालेली असून पुढील सहा महिने अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. पोळ्याच्या पाडव्याला जिवंत कोंबडीला ११६ ते१२० रुपये प्रति किलोचा दर ठोक बाजारात राहील.
चिकनचा ठोक बाजारातील दर ११६ रुपये किलो आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात हा दर ६० रुपयांपर्यंत खाली येतो. यंदा दर कमी असल्याने एक दिवसाच्या पिल्लांची मागणी कमी होती. त्यामुळे पिल्लांचे दर सहा रुपयांपर्यंत घसरले होते. (Food) आता हा दर ४७ ते४८ रुपयांवर पोचला आहे. दिल्ली, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशा या भागातून अधिक मागणी आहे. या राज्यात दर १४० ते १६० रुपयांपर्यंत पोचले आहेत.
या राज्यात श्रावण महिना संपल्याने मागणी वाढलेली आहे. आता महाराष्ट्रातील श्रावण महिना संपणार आहे. मात्र, तीन दिवसांनी गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल चिकनच्या व्यवसायात होईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या एक दिवसाच्या पक्ष्यांचा पुरवठा २५ ते ३० टक्क्यांनी कमी केला आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसत आहे. दरात वाढ झालेली आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने ब्रॉयलरच्या दरात पहिल्यांदाच श्रावण महिन्यातही वाढ पहायला मिळत आहे.
- गजानन वानखेडे,
संचालक, व्यंकटेश हॅचरीज ऍण्ड फूड प्रा. लि.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.