Health Care: Sakal
लाइफस्टाइल

Health Care: मुलांना ‘चंडिपुरा’चा धोका,जाणून घ्या लक्षण

Health Care: या आजारात व्हायरल तापासारखा ताप येतो व चंडीपुराची लागण झाल्यास पोट दुखणे, जुलाब, उलट्या होतात.

सकाळ वृत्तसेवा

केवल जीवनतारे

डेंगी, स्क्रब टायफस, चिकन गुनियाचा प्रकोप उपराजधानीसह पूर्व विदर्भात सुरू आहे. त्यातच गुजरातमध्ये चंडिपुराने (मेंदूज्वर) हाहाकार माजविला आहे. यामुळे पूर्व विदर्भातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चंडिपुराचा नागपूरसहित पूर्व विदर्भाला धोका निर्माण झाला आहे. २००९ ते २०१६ या काळात चांगलाच धुमाकूळ घातलेल्या या आजाराने त्यावेळी शंभरावर बळी घेतले होते.

चंडीपुरा तापाचे रुग्ण सर्वप्रथम भंडारा जिल्ह्यातील चंडीपुरा येथे १९६५ साली आढळले होते. त्यावरून त्याला चंडीपुरा असे नाव देण्यात आले. ‘सँडफ्लाय’पासून चंडीपुराची लागण व प्रसार होतो. मुख्यत: गाई, म्हशी व अन्य गुरेढोरांवर या ‘सँडफ्लाय’ आढळतात. ग्रामीण भाग असलेल्या ठिकाणी हा आजार लवकर पसरतो. चंडीपुराने २००५ साली पूर्व विदर्भात हाहाकार माजविला होता. त्यानंतर चार वर्षांनी, २००९ व २०१६ मध्ये चंडीपुराने शंभरावर मुलांचे बळी घेतले. तर शेकडो रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाच्या विशेष उपाययोजनांमुळे २०१६ नंतर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत रुग्णांची नोंद झाली नाही. परंतु यावर्षी गुजरातमध्ये चंडिपुराचा रुग्ण आढळल्याने पुन्हा धोका निर्माण झाला आहे.

काय आहे चंडीपुरा ?

‘सँडफ्लाय’ गुरांना चावल्यानंतर चंडीपुराचे विषाणू त्यांच्या शरीरात शिरतात. त्यानंतर ते रात्री एखाद्या व्यक्तीला चावल्यास हे विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश घेतात. अशाप्रकारे याचा प्रसार होतो. या आजारात व्हायरल तापासारखा ताप येतो व चंडीपुराची लागण झाल्यास पोट दुखणे, जुलाब, उलट्या होतात. ताप प्रचंड वाढून तो मेंदूत गेल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. यावर नेमका औषधोपचार नाही. लक्षणे बघून उपचार केले जातात.

विशेष असे की, या साथ आजारावर नागपूरच्या मेडिकलमधील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात तत्कालीन सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजाराम पोवार यांनी संशोधन केले होते. पुढे डॉ. पोवार यांनी मेडिकलचे अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळला होता.

मेंदूज्वराची लक्षणे

९महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना होतो

अचानक तीव्र ताप

स्वभावात बदल (बडबड करणे)

डोळे फिरविणे, मेंदूवर परिणाम

उलटी, शौच होणे

पूर्व विदर्भातील मृत्यू

२००९ - २१ बालकांचा मृत्यू

२०११ - १५ बालकांचा मृत्यू

२०१२ - २० बालकाचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

SCROLL FOR NEXT