Children Skills  esakal
लाइफस्टाइल

Children Skills : मुलांतील हे गुण त्यांना बनवतात यशस्वी, यशाच्या शर्यतीत इतरांना टाकतात मागे

साक्षी राऊत

Children Skills To become successful : मुले हे विविष्ट कला गुण आणि वैशिष्ट्यांसह जन्माला येतात. त्यानुसार त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्ताही वेगळ्या असू शकतात. परंतु यशस्वी मुलांमध्ये काही खास गुण असतात तर काही गुण त्यांच्यात इतर मुलांप्रमाणेच असतात. आज आम्ही तुम्हाला यशस्वी मुलांच्या अशा गुणांबाबत सांगणार आहोत जे सामान्य मुलांमध्ये नसतात. तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये असे काही गुण दिसत असतील तर ते नक्कीच यशस्वी होतील. चला तर जाणून घेऊया मुलांच्या या गुणांबद्दल.

आत्मविश्वास

मुलांमध्ये आत्मविश्वास असल्यास ते स्वत:ला उत्तम प्रेझेंट करू शकतात. जी मुले मेहनत आणि जिद्दीच्या बळावर परीक्षेत चांगले मार्क्स घेतात ते यशाची उंची लवकर गाठतात. ही मुले त्यांच्यात असलेल्या आत्मविश्वामुळे चांगल्याप्रकारे परफॉर्म करतात आणि संकटांशी सामना करण्यास तत्पर असतात. त्यांच्या समस्येवर तोडगा कसा काढता येईल हे त्यांना ठाऊक असते.

सहानुभूती

एखाद्याचे बोलणे ऐकून त्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता असणारी मुले भविष्यात यशस्वी होतात. अशी मुले आयुष्यात पुढे जाण्यासाठी सगळे प्रयत्न करून बघतात आणि ते आयुष्यात त्यांच्या क्षमतेबाबत फार कॉन्फिडंट असतात.

नवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक

यात काहीच शंका नाही की लहान मुले ही फार उत्साही असतात. त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्यास आवडते. मुलांच्या या सवयींचा फायदा त्यांना भविष्यात होतो. त्यामुळे नवं काही जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्या मुलांना यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तेव्हा तुमची मुलं चुका करत असतील किंवा काही जाणून घेण्यास उत्सुक असतील तर त्यांना रागवण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा. (Skills)

स्वत:वर नियंत्रण

जी मुले त्यांच्या भावना, इच्छा आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता ठेवतात ते यशाच्या मार्गावर असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची मुलं यशस्वी व्हावी तर त्यांना स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास शिकवा. (Lifestyle)

सकारात्मक दृष्टिकोण

सकारात्मक दृष्टिकोण असलेली मुले त्यांना येणाऱ्या अडथळ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोणातून बघतात. त्यामुळे अशी मुले आयुष्यात लवकर यशस्वी होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT