Child Care Tips: वैष्णवीचे (नाव बदलले आहे) वडील मोठे उद्योजक आहेत. शहरापासून लांब; परंतु प्रशस्त असे घर आहे. तिची कोणतीही मैत्रीण नाही. त्यामुळेच तिने मोबाइलशी मैत्री केली. परिणामी, वयाच्या चौथ्या वर्षीही तिला फारसे बोलता येत नव्हते. यानंतर जाग आलेल्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांचे उपचार आणि पालकांशी वाढलेला संवाद यामुळे वैष्णवी आता बोलत आहे. परंतु अशी अनेक बालके आहेत जी सध्या स्व-मग्नतेत (ऑटिझम) हरवताहेत. पालकांबरोबर संवादाचा अभाव, विभक्त कुटुंबपद्धती ही याची प्रमुख कारणे आहेत.
कुटुंबातील हरवलेल्या संवादाचा परिणाम मुलांवर होत आहे. पती आणि पत्नी हे दोघेही दिवसभर कामानिमित्त घराबाहेर तर घरी आल्यानंतर सोशल मीडियावर व्यस्त राहतात. त्यामुळे एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांना पालकांचा पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांना बोलता न येणे यासह स्व-मग्नतेची समस्या निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
नोकरी आणि घर, या जबाबदाऱ्या एकाच वेळी पालकांवर आल्यामुळे या समस्येमध्ये वाढ होत आहे. सध्या अशा मुलांची संख्या वाढत असून, बोटावर मोजण्याइतकेच पालक उपचारासाठी येतात. विभक्त कुटुंब असल्याने मूल एकटेच घरात राहते. घरी बोलायला कोणी नसल्यामुळे मुलांच्या कानावर कमी शब्द पडतात.
नऊ महिन्यांचे बाळ आवाज ऐकल्यानंतर प्रतिसाद न देणे
आनंद, दुःख, आश्चर्य, रागावर व्यक्त न होणे
१२ महिन्यांत सामान्य खेळ खेळता न येणे
पालक दोघेही कामावर असल्याने मुलांशी बोलायला कुणीही नसते
गर्भधारणेदरम्यान धोकादायक व्हायरल इन्फेक्शन, आवश्यक घटकांची कमतरता
अमली पदार्थांचे व्यसन किंवा जास्त प्रदूषण
मुलांचे मोबाइल, टीव्हीसमोर जास्त वेळ बसणे
लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा
जिज्ञासावृत्ती वाढीसाठी त्यांच्याशी खेळा
एकटे न सोडता, मुलांशी सतत संवाद साधा
मोबाइलऐवजी मैदानावर खेळण्यासाठी घेऊन जा
मेंदूला चालना मिळेल अशा विषयांची त्यांच्यात आवड निर्माण करा
वाढत्या विभक्त कुटुंबपद्धतीचा हा परिणाम आहे. यामुळे पालकांनी मुलांशी संवाद ठेवावा. दोन वर्षापेक्षा लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे. पाच वर्षापर्यंतच्या मुलांना एका तासापेक्षा अधिक वेळ मोबाइल देऊ नये, तसेच टीव्हीजवळ बसू देऊ नये. लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यात लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे ठरतात.
- डॉ. प्रशांत चव्हाण, बालरोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.