Children Mental Health esakal
लाइफस्टाइल

Children Mental Health : मुलांनाही असतो Stress अन् Tension;  असे बनवा त्यांना मानसिकदृष्ट्या Strong

तुमच्या मुलाला सकारात्मक विचार करायला शिकवा

Pooja Karande-Kadam

Children Mental Health : केवळ मोठ्या माणसांनाच तणावाचा सामना करावा लागतो, हे चुकीचे आहे. लहान मुलांनाही तणाव, चिंता, टेंशनचा सामना करावा लागतो. टेंन्शन आल्यावर काय करावे यासाठी मुलांना योग्य मार्ग माहिती नसतो. तेव्हा मुलांवर सगळ्याच गोष्टींचे जास्त प्रेशर येत असतं. त्यामुळं मुलं अधिकच डिप्रेशनमध्ये जात असतात.

मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांना रोज नवनवीन प्रयत्न करावे लागतात. त्यांना केवळ शिक्षणच नाही तर ऐहिक ज्ञानही देणे गरजेचे आहे. जेणेकरून मूल प्रत्येक क्षेत्रात पुढे राहील. आजकाल मुलं पौगंडावस्थेत पोचतात तेव्हा त्यांना अभ्यास आणि करिअरचं ओझं पेलवता येत नाही. (How to make a child mentally strong)

मुलं खूप लवकर तणाव आणि नैराश्याचे बळी होतात. अशी मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यामुळे मुलांना अभ्यास, शाळा आणि आजूबाजूच्या वातावरणात होणारे बदल याविषयी सोयीस्कर वाटणे महत्त्वाचे आहे.

जर मुलाला दडपण जाणवत असेल तर त्यांना तणावाचे योग्य व्यवस्थापन करायला शिकवा. जेणे करून ते मोठे होऊन मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. मुलं मोठे झाल्यावर सर्व प्रकारच्या परिस्थिती हाताळायला शिकतील.

जर तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल आणि तणाव वाटत असेल तर त्याला या मार्गांनी तणावमुक्त राहण्यास शिकवा. त्यासाठी या काही टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील.

पुरेशी झोप

मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी झोप खूप महत्त्वाची असते. म्हणून, आपल्या मुलाची झोपण्याची वेळ निश्चित करा. शाळेव्यतिरिक्त, सुट्टीच्या दिवशीही झोपण्याची ठराविक वेळ ठेवा. जेणेकरून त्याची झोप पूर्ण होते आणि मन शांत राहते. ज्या मुलांना पुरेशी झोप मिळते त्यांची चिडचिड, अस्वस्थता आणि तणाव कमी असतो. आणि तो त्याच्या अभ्यासावर आणि खेळावर चांगले लक्ष देतो.

आपल्या आहाराची काळजी घ्या

जर मूल कमी खात असेल किंवा तणावामुळे जास्त खात असेल. जंक फूड, चॉकलेट, चिप्स यांसारख्या गोष्टी खाण्याची जास्त मागणी होते. जर मुलाच्या खाण्यापिण्याच्या वर्तनात बदल झाला असेल तर त्याला निरोगी पदार्थ खायला द्या.

खेळण्यास प्रोत्साहित करा

मुलाला मोबाईल,ऑनलाईन गेमिंगपासून दूर ठेवा. त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. ऑनलाइन गेमिंगमुळे मुलांमध्ये झोप उडते. त्यामुळे तणाव, चिडचिडेपणा आणि आक्रमकता निर्माण होते. म्हणून त्यांना बाहेर खेळायला घेऊन जा. त्यांच्यासोबत वेळ घालवा.

मुलासोबत वेळ घालवा

आजकाल नोकरी करणाऱ्या पालकांना मुलांसोबत घालवायला कमी वेळ मिळतो. त्यामुळे मुले एकटेपणाची शिकार होतात आणि तणावग्रस्त होतात. मुलासोबत थोडा वेळ घालवा. दररोज मुलासोबत बोला.

थेट मुद्द्याचं न बोलता खेळत, काही गोष्टी सांगत त्यांच्याशी बोला. यामुळे मुले त्यांच्या भावना व्यक्त करतात. तसेच तुम्हाला समजेल की मूल कोणत्याही मानसिक समस्येतून जात आहे की नाही.

मुलाच्या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करा

मुलाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्याच्यावर चिडचिड करू नका. 'तुला लाज वाटली पाहिजे, तुला या गोष्टीची भीती वाटते' असे शब्द वापरण्याऐवजी, त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलाला समजावून सांगा की प्रत्येकजण चुका करतो आणि घाबरण्याऐवजी त्यांच्याशी वागण्याचा विचार करा.

तुमच्या मुलाला सकारात्मक विचार करायला शिकवा

प्रत्येक गोष्टीत नकारात्मक गोष्टी शोधण्याऐवजी तुमच्या मुलाला सकारात्मक विचार करायला शिकवा. अनेक वेळा काही गोष्टींच्या नकारात्मक परिणामांचा विचार करून मुले अस्वस्थ आणि तणावग्रस्त होतात. त्यामुळे त्यांना सकारात्मक विचार करायला शिकवा. यामुळे त्यांना चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT