Chocolate Day beauty tips chocolate benefits for youthful and glowing skin  
लाइफस्टाइल

Chocolate Day: चेहऱ्याचा हरवलेला ग्लो तुम्हाला चॉकलेट मिळवून देईल

चॉकलेट हे फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपयोगी नाही तर तुमच्या त्वचेसाठीही तितकेच फायद्याचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

नुसतं चॉकलेट म्हटल तरी सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतो. जगात अशी एकही व्यक्ती नाही ज्याला चॉकलेट आवडत नसेल. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण चॉकलेटच्या विविध पदार्थांचा अस्वाद घेत असतो. चॉकलेट मिल्क शेक, चॉकलेट सॅन्डविच, चॉकलेट आइस्क्रीम, पेस्ट्री असे विविध पदार्थांची चव आपण सर्वांनी चाखली आहे. पण तुम्हाला माहितीय का चॉकलेट हे फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपयोगी नाही तर तुमच्या त्वचेसाठीही तितकेच फायद्याचे आहे.

चॉकलेटमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये डार्क चॉकलेट हे मानवाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळं आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. इतकचं नव्हे तर हेच डार्क चॉकलेट चेहऱ्यावर लावलं तर त्याचे अनेक फायदे होतात. तर जाणून घेऊयात ...

डार्क चॉकलेट त्वचेवर लावल्याने त्वचेचा रंग सुधारतो आणि त्वचा चमकदार होते. याशिवाय त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. कॅफीन आणि थियोब्रोमाइन नावाची संयुगे गडद चॉकलेटमध्ये आढळतात ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेची लवचिकता कायम राहते.

मॉईश्चरायझर आहे चॉकलेट

डार्क चॉकलेट हे मॉईश्चरायझर आहे. चॉकलेट त्वचेला मॉईश्चर करते. तसेच, यामध्ये कॅफिन असते ज्यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते.

अँटीऑक्सिडंन्टची कमाल

चॉकलेट कोकोपासून बनलेले असते, जे अँटीऑक्सिडंन्टने युक्त आहे. कोको बटर तर त्वचेला चांगल्या प्रकारे हायड्रेटही करते.

त्वचेवर दिसणार नाही वयाचा परिणाम

35 शी पार केलेल्या बहुतांश महिला आपलं वय लपवण्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. त्यासाठी अँटी एजिंग क्रीमचा वापर करतात. पण चॉकलेट उपलब्ध असताना या महागड्या क्रिमचा काय गरज. चॉकलेटमध्ये पोलिफेनल खूप जास्त असते, जे त्याला कोको बटरमुळे मिळते. हेच पोलिफेनल तुमच्या त्वचेला तरुण राखण्यात मदत करते आणि तुमची त्वचाही चमकत राहते.

घरीच तयार करा चॉकलेट फेस मास्क

पाण्यात पूर्ण विरघळेपर्यंत चॉकलेट गरम करा. त्यानंतर त्यामध्ये मध किंवा अंड्याचा पिवळा भाग मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे चेहऱ्यावर किमान 20 मिनिट तर ठेवा. त्यानंतर चेहरा गरम पाण्याने धुवा. तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Holiday on Poll Day: मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर; नागरिकांना कर्तव्य निभावण्याचं आवाहन

Ambegaon Assembly Election : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

Hingoli Assembly Election 2024 : हिंगोली विधानसभा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल

Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक कायम! अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्हाची दिली परवानगी पण...

IND vs NZ 2nd Test : What a Ball... रोहित शर्मा गांगरला, टीम साऊदीनं स्टम्प उडवला; तरीही दिवस भारताच्या नावावर राहिला

SCROLL FOR NEXT