Christmas 2022 Importance of Colors : नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण आहे. पण आता हा सण जगभर सर्वच धर्मिय मोठ्या उत्साहात साजरा करतात. याकाळात सगळीकडे रोषणाई, ख्रिसमस ट्री सजवले जातात. हे झाड सजवताना रंगीबेरंगी रोषणाई करण्यात येते, गिफ्ट्स ठेवण्यात येतात. यात प्रामुख्याने लाल, हिरवा, पांढरा आणि सोनेरी या रंगांचा वापर केला जातो. या रंगांचं खास महत्व आहे. त्यातून खास संदेश दिला जातो.
लाल रंग
नाताळात लाल रंगाचा विशेष वापर केला जातो. सगळ्याच सजावटीत याचा वापर होतो. लाल रंग प्रभु येशूच्या रक्ताचं प्रतिक आहे. येशूच्या बलिदानचं प्रतिनिधीत्व करतात. याशिवाय प्रेमाचं प्रतिक आहे.
हिरवा रंग
हिरवा रंग प्रभु येशूच्या शाश्वत जीवनाचं प्रतिक मानलं जातं. ते आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. सोबतच हा रंग निसर्गाचं प्रतिक आहे. झाडं हिवाळ्यातपण आपला रंग सोडत नाहीत. रोमन लोक याला सौभाग्याचं प्रतिक समजतात.
सोनेरी (गोल्डन) रंग
सोनेरी रंग भेटीचं प्रतिक समजलं जातं. प्रभु येशू एक मौल्यवान भेटीच्या रुपात या जगाला मिळाले. यासाठी गरिब मरियमला निवडण्यात आलं. यातून देवासाठी सगळे समान आहेत हा संदेश मिळतो.
पांढरा रंग
पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचा संकेत देतो. सोबतच हिवाळ्यात पडणाऱ्या बर्फाचं प्रतिक आहे. म्हणूनच ख्रिसमस ट्री सजवताना कापूस वापरतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.