Christmas 2023  esakal
लाइफस्टाइल

Christmas 2023 : अंतराळात वाजलेलं पहिलं गाणं होतं 'जिंगल बेल्स', जाणून घ्या ख्रिसमसच्या खास गोष्टी

कोका-कोला आणि सांताक्लॉज यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

Pooja Karande-Kadam

Christmas 2023 :

ख्रिसमस अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. २५ डिसेंबरला प्रभू येशूच्या जन्मोत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. ख्रिसमसचा उत्साह देशभर दिसून येत आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. केवळ ख्रिश्चन धर्माचे लोकच नाही तर प्रत्येक धर्माचे लोक हा सण साजरा करतात.

असं म्हटलं जात की, येशू ख्रिस्तांच्या मृत्यूनंतर 25 डिसेंबर हा दिवस रोमन कॅथोलिक चर्चने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निवडला होता. येशूच्या जन्माच्या नेमक्या तारखेबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही. जगभरातील ख्रिश्चनांसाठी हा सर्वात मोठा सण आहे.

या दिवशी ख्रिश्चन धर्माचे लोक येशू ख्रिस्ताचा जन्म आनंदाने साजरा करतात. हा दिवस भेटवस्तू, कार्ड, ख्रिसमस ट्री, दिवे, पार्ट्या इत्यादी अनेक प्रकारे साजरा केला जातो. त्याबद्दल आपण काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

तुम्हाला माहीत आहे का की ख्रिसमस हा शब्द क्राइस्ट मास या शब्दापासून आला आहे. पूर्वी याला इंग्रजीत Cristes Maesse असे म्हणतात. ज्याचा अर्थ होता- ख्रिश्चन महिना

'जिंगल बेल्स' हे अंतराळात वाजवलेले पहिले गाणे होते. होय, 16 डिसेंबर 1965 रोजी 'जिंगल बेल्स' हे नासाच्या जेमिनी 6A अंतराळ उड्डाणाच्या वेळी अंतराळात वाजवले जाणारे पहिले गाणे होते.

ख्रिसमस ट्रीच्या इतिहासाबाबत अनेक मते आहेत. पण जेव्हा आपण ख्रिसमस ट्रीबद्दल बोलतो तेव्हा आमचा असा विश्वास आहे की प्रिन्स अल्बर्ट (क्वीन व्हिक्टोरियाचा पती) यांनी इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री लोकप्रिय केली. परंतु हे खरे नाही, खरेतर ख्रिसमस ट्री प्रथम डिसेंबर 1800 मध्ये राणीच्या लॉज विंडसर येथे राजकुमारी शार्लोटने स्थापित केले होते.

तुम्हाला असेही वाटते का की कोका-कोला आणि सांताक्लॉज यांचा एकमेकांशी काही संबंध आहे? लाल पोशाख परिधान केलेल्या सांताक्लॉजची प्रतिमा तयार करण्याचे श्रेय अनेकदा कोका-कोला कंपनीला दिले जाते, परंतु हे खरे नाही. सांताक्लॉजची प्रतिमा 1870 मध्ये थॉमस नास्टने तयार केली होती.

ख्रिसमस दिवशी ट्रि सजवणे ही कल्पना पहिल्यांदा 16 व्या शतकात जर्मनीमध्ये वापरण्यात आली.

कँडी केन्स आणि ख्रिसमस ट्री यांच्यात काय संबंध आहे? कँडी केन्स 1670 चा आहे, जेव्हा जर्मनीतील एका गायकाने त्याच्या गायनादरम्यान गर्दीला शांत करण्यासाठी कँडी केन दाखवली. परंतु कालांतराने लोक ख्रिसमसशी कसे जोडले गेले याबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही.

जपानमध्ये, लोक पारंपरिक ख्रिसमस डिनरसाठी KFC मध्ये जातात. 1974 मध्ये, KFC ने आपली "केंटकी फॉर ख्रिसमस" मार्केटिंग मोहीम सुरू केली तेव्हा ते जपानमध्ये लोकप्रिय झाले. तेव्हापासून KFC जपानमध्ये ख्रिसमस डिनरसाठी लोकप्रिय पर्याय बनला आहे.

⁠'वुई विश यू अ मेरी ख्रिसमस' या गाण्याचा इतिहास, असं म्हणतात की, दारू मिळावी या लालसेपोटी समाजातील काही गरीब लोकांनी हे गाणे गायले आहे.

राणी व्हिक्टोरियाने पहिले अधिकृत ख्रिसमस कार्ड पाठवले. होय, राणी व्हिक्टोरिया ही ख्रिसमस कार्डे पाठवणारी पहिली व्यक्ती होती. पण त्याही आधी पहिले कार्ड 1843 मध्ये आले, जेव्हा सर हेन्री कोल यांनी 1,000 ख्रिसमस कार्डे तयार केली आणि विकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT