Christmas 2023 esakal
लाइफस्टाइल

Christmas 2023 : ख्रिसमसला हेच मेन्यू स्टार्टअपला ठेवा, पार्टी नेहमी लक्षात राहील!

पार्टीसाठी हे हेल्दी ऑप्शन्स पाहुण्यांना जास्त आवडतील

Pooja Karande-Kadam

Christmas 2023 :

ख्रिसमसचा सण 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. दरवर्षी जगातील जवळपास सर्वच देश हा दिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशूला देवाचा पुत्र मानले जाते. पूर्वी रोममध्ये हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असे.

हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. लोक या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवतात. सकाळी ते चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि संध्याकाळी ते एकत्र साजरे करतात. नाताळच्या निमित्ताने विविध प्रकारचे पदार्थही तयार केले जातात. रम केकपासून अनेक प्रकारचे पदार्थ आणि मिठाई बनवून जवळच्या लोकांमध्ये वाटली जाते.

जर तुम्ही घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करत असाल तर तुमच्या ख्रिसमस पार्टी मेनू प्लॅनमध्ये काही सोप्या आणि झटपट पदार्थांचा समावेश करा. हे पदार्थ ख्रिसमस पार्टीच्या मेनूमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.

पनीर टिक्का

पनीर टिक्का शाकाहारी लोकांसाठी सर्वोत्तम स्टार्टर आहे. त्याची चव अप्रतिम आहे आणि लहान मुलांनाही ते आवडते. हे तुम्ही घरीही पाहुण्यांसाठी तयार करू शकता. कारण त्याची रेसिपी साधी सोपी आहे.

स्वीट कॉर्न चाट

हा एक निरोगी आणि चविष्ट नाश्ता आहे जो प्रत्येकजण, मुले आणि वृद्ध दोघेही खाऊ शकतात. विशेष म्हणजे साखरेचे रुग्णही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. शाकाहारी लोकांना दिवाळीत काही खास खायचे असेल तर ते भाज्यांसोबत बनवलेले स्वीट कॉर्न चाट खाऊ शकतात.

जामुन मोजितो

पेयांमध्ये तुम्ही जामुन मोजितो बनवू शकता. हे ब्लॅकबेरी रस, लिंबू, काळे मीठ आणि सोडा मिसळून बनवले जाते. यामध्ये बर्फाचा वापर ऐच्छिक आहे. पण या अनोख्या पेयाने सेलिब्रेशनची मजा द्विगुणित करता येते.

खीर गोड

गुलाब जामुन, रसगुल्ला किंवा इतर मिठाईंमध्ये साखरेचा प्रमाण जास्त असतो. जर तुम्ही मिठाईमध्ये काही आरोग्यदायी पर्याय शोधत असाल. तर तुम्ही तांदळापासून बनवलेली खीर निवडू शकता. घरी बनवताना तूम्ही कमी साखर घाला. घरात साखरेचा रुग्ण असेल तर त्यालाही ही चविष्ट खीर खायला मिळेल.

फ्रूट सॅलेड

पाहुण्याच्या प्रकृतीची काळजी असेल तर तुम्ही त्यांना फ्रेश फळांचे सॅलडही बनवू शकता. फ्रूट कस्टर्ड आणि सॅलेडमध्ये कमी गोड बनवून तुम्ही मधुमेह असलेल्या पाहुण्यांनाही गोड खाण्याचा आनंद देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT