प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर असा वाटतो आणि म्हणूनच चेहऱ्याची सुंदरता वाढवण्य़ासाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण अनेक वेळा वेगवेगळ्या कॉस्मेटिक मटेरियल वापराने काहीच फरक पडत नाही. याउलट चेहऱ्याला बऱ्याचदा नुकसानच होते. आज बाजारात अनेक आयुर्वेदिक प्रॉडक्ट तुम्हाला पाहायला मिळतील. याशिवाय तुमच्या स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर करून तुम्ही चेहरा उजळ व दागविरहित ठेवू शकता.
भारतीय आहार पध्दतीत अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. ज्याचा आरोग्याला फायदा होतोच. शिवाय चेहरा सुंदर दिसण्यासाठी मदत होते. या मसाल्यात चक्रीफूल आणि दालचीनीचा वापर चेहरा सुंदर होण्य़ासाठी फायदेशिर ठरू शकतो. याच्या वापराने पिंपल्स, ड्राई स्किन, सुरकुत्यापासून सुटका होऊ शकते. या दिवाळीत (Diwali)चेहरा उजळ हवा असेल तर दालचिनी वाॅटर वापरा.आपण या पदार्थाचा वापर करून दालचिनी अँटी एजिंग वाॅटर (Dalchini Anti Aging Water)कसे बनवायचे जाणून घेऊया.
साहित्य
चक्रीफूल- 3
दालचीनी- 1 इंच
पानी- 500 मिलीलीटर
तयार करण्याची पद्धत
- पॅनमध्ये तिन्ही वस्तू एकत्र करून घ्या.
-गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्या.
-पाण्य़ाचा रंग बदलल्यावर याला गॅसवरून खाली उतरा
-थंड झाल्यानंतर याला एका बाॅटलमध्य़े भरून फ्रिजमध्ये भरून ठेवा.
-तुमचा अँटी एजिंग फेश वाॅश झाला तयार.
अँटी एजिंग वाॅटर लावण्याची पध्दत
रात्री झोपण्य़ापूर्वी चेहरा स्वच्छ करून घ्या. काॅटनवर दालचिनीचे पाणी घेऊन चेहरा आणि मानेला लावा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. या घरगुती वापराने तुमचा चेहरा तजेलदार होऊन जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.