Cleaning Tips  esakal
लाइफस्टाइल

Cleaning Tips : स्टेनलेस स्टीलची बॉटल स्वच्छ करायचीयं? मग, ट्राय करा व्हिनेगरचे ‘हे’ सोपे उपाय, झटक्यात होईल चकाचक

Stainless Steel Bottle Cleaning Tips : स्टेनलेस स्टीलच्या बॉटलमध्ये दररोज पाणी ठेवल्याने, बॉटलला आतून डाग पडतात.

Monika Lonkar –Kumbhar

Stainless Steel Bottle Cleaning Tips : आजकाल अनेक जण ऑफिसला जाताना, शाळेत-कॉलेजला जाताना स्टेनलेस स्टीलच्या बाटलीचा वापर करतात. या बाटलीत दररोज पाणी ठेवल्याने, बॉटलला आतून डाग पडतात. हे डाग काढून टाकण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता करत राहणे, गरजेचे आहे. परंतु, काहींना असे वाटत असेल की स्टेनलेस स्टीलची बॉटल किंवा थर्मास साफ करणे हे सर्वात कठीण काम आहे.

परंतु, असे अजिबात नाही. तुम्ही काही सोप्या उपायांच्या मदतीने स्टेनलेस स्टीलची बॉटल अगदी सहजपणे आणि खोलवर स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही व्हिनेगरची मदत घेऊ शकता. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला स्टेनलेस स्टीलची बॉटल स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचे सोपे उपाय सांगणार आहोत. कोणते आहेत ते उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण स्टेनलेस स्टीलची बॉटल आणि थर्मास स्वच्छ करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी बेकिंग सोड्यामध्ये व्हिनेगरचे काही थेंब मिसळा. त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट बॉटलच्या आतमध्ये टाका. त्यानंतर, ब्रशच्या मदतीने बॉटल आतून घासा. त्यानंतर, काहीवेळाने बॉटल पाण्याने स्वच्छ करा.

व्हिनेगर आणि गरम पाणी

व्हिनेगरमध्ये गरम पाणी मिसळून, त्याचा वापर तुम्ही स्टेनलेस स्टीलची बॉटल स्वच्छ करण्यासाठी करू शकता. हा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला बॉटलमध्ये अर्धा कप व्हिनेगर टाकावे लागेल.

त्यानंतर, अर्धा कप गरम पाणी घालून बॉटलचे झाकण लावून घ्यावे. आता बॉटल जोरजोराने हलवा, जेणेकरून व्हिनेगर बॉटलच्या आतील बाजूस चांगल्या प्रकारे कोट होईल. आता ब्रशच्या मदतीने बॉटल आतून चांगली घासून घ्या. काही वेळानंतर, बॉटल चांगली स्वच्छ धुवून घ्या. यामुळे, बाटलीमध्ये असलेली सर्व घाण चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल.

व्हिनेगर आणि टूथपेस्ट

स्टेनलेस स्टीलची बॉटल चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि टूथपेस्टचा वापर करू शकता. त्यासाठी एक बाऊल घ्या. त्यामध्ये आता थोडी टूथपेस्ट घ्या आणि त्यात २ चमचे व्हिनेगर मिसळा. आता यापासून तयार केलेली पेस्ट बॉटलमध्ये घाला. त्यानंतर, ब्रशच्या मदतीने बॉटल चांगली घासून घ्या. त्यानंतर, काही वेळ बाटली तशीच ठेवून, चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Beed Voter Assembly Polls : तीन हजार मतदारांची एकाही उमेदवाराला पसंती नाही

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT