Cleaning Tips : एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेलं की तिथे रहायची इच्छाच होत नाही. एकवेळ पाहुण्यांच्या घरात झोप लागेल. पण सकाळी उठून जेव्हा अंघोळ करतो तेव्हा तोंड वाकडं करूनच अघोळ करावी लागते.
काही लोक तर आपल्या घरी परतल्यावर पुन्हा अंघोळ करतात. पाहुण्यांकडे अंघोळ केल्यासारखीच वाटली नाही, किती घाण होते ते बाथरूम, तिथली बादली अन् तो मग तरी हातातसुद्धा घेऊ वाटला नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या जातात.
तुम्हालाही कधीतरी असा अनुभव आला असेल. तर तुम्हाला अशा पद्धतीने कोणी नावे ठेवलेली आवडणार नाहीत. त्यामुळेच स्वत:चे घर एकवेळ आवरलेले टापटीप नसेल तरी चालेल. पण बाथरूम अन् तिथली भांडी स्वच्छच ठेवा.
बाथरूममध्ये आंघोळीसाठी प्लास्टिकच्या बादल्या आणि मग सहसा ठेवले जातात. दररोज पाणी दिल्याने या दोन्ही प्लास्टिकच्या वस्तू काळ्या पडतात. यामुळे बादली आणि मग रंगहीन होतात. ते स्वच्छ करूनही स्वच्छ होत नसल्याने फेकून दिले जातात.
प्लास्टिकच्या वस्तू स्वच्छ करायचे याची युक्ती फार कमी लोकांना माहित असते. चला तर मग आज तुम्हाला बाथरूमची बादली आणि मग स्वच्छ करण्याचे असे सोपे उपाय सांगत आहोत जेणेकरून या दोन गोष्टी नव्यासारख्या चमकतील. (Cleaning Tips)
बाथरूमच्या बादल्या आणि मग कसे स्वच्छ करावे
बेकिंग सोडा
बादली आणि मग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर बादल्या आणि मगवर लावून स्क्रब करा. असे केल्याने बादली आणि मग पूर्णपणे चमकतील.
लिंबू
तुम्ही बादलीला लिंबाने ही चमकवू शकता. यामुळे पाण्याचे डाग सहज साफ होतात. डिटर्जंट पावडरमध्ये लिंबाचा रस मगमध्ये मिसळा आणि मग आणि बादली त्यात चांगले भिजवून ठेवा. अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून टाका.
ब्लीच पावडर
ब्लीच पावडरने तुम्ही तुमच्या बाथरूमची बादली ही उजळवू शकता. ही पद्धत अतिशय परिणामकारक देखील ठरू शकते. तुम्हाला फक्त एका कपमध्ये पाण्यात ब्लीच पावडर मिसळून पेस्ट तयार करायची आहे आणि ती बादली आणि मगवर लावायची आहे. यामुळे बादली लगेच साफ होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.