Cockatil Attaire esakal
लाइफस्टाइल

Cockatil Attaire : पार्टीसाठी निवडला जाणारा कॉकटेल अटायर म्हणजे नेमकं काय?

ऑफिस असो किंवा पार्टी प्रत्येकाला फॅशनेबल आणि आकर्षक दिसायचे असते

सकाळ डिजिटल टीम

Cockatil Attaire : ऑफिस असो किंवा पार्टी प्रत्येकाला फॅशनेबल आणि आकर्षक दिसायचे असते. पार्टी, लग्न किंवा विशेष कार्यक्रमात फॅशनेबल दिसण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात. तुम्ही कॉकटेल अटायर असं काही ऐकलय का? खरं तर हा एक ट्रेडिंग फॉरमॅट आहे जो फंक्शन्समध्ये खूप फॉलो केला जातो.

वास्तविक, कॉकटेल अटायर एक प्रकारचा ड्रेस कोड आहे, ज्यामध्ये लोकांना बीन रंगाच्या पोशाखांमध्ये कॉकटेल पार्टीचा भाग असावा लागतो. बाय द वे, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिलांनी कॉकटेल अटायरमध्ये फॅशनशी संबंधित कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

कॉकटेल अटायर काय आहे?

कॉकटेल पार्ट्यांमध्ये महिला गुडघ्यापर्यंत आणि नी लेंथ म्हणजेच गुडघ्याच्या लांबीचे कपडे, स्कर्ट आणि ब्लाउजची फॅशन कॅरी करू शकतात. गडद, मॅटेलीक रंग यासाठी उत्कृष्ट पर्याय आहेत. अॅक्सेसरीजमध्ये, स्टेटमेंट नेकलेस, स्पार्कलिंग इयररींग्ज आणि चिक ब्रेसलेट घालून तुम्ही पार्टीची शान बनू शकता.

महिलांनी कॉकटेल अटायर करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

अशा प्रकारचे कपडे घालू नका : कॉकटेल कपड्यांमध्ये स्टाइलची काळजी घेतली पाहिजे, पण शरीर उघड दिसेल असे कपडे घालू नये. लो-प्रोफाइल नेक एरिया आणि हाय कट कपडे घालणे टाळा. अशी स्टाईल निवडा ज्यामुळे तुम्ही बोल्ड दिसाल

नेकलाइनकडे लक्ष द्या : व्ही-लाइनसारखे अटायर तुम्हाला स्टायलिश लूक देऊ शकतात, परंतु ज्या नेकलाइन खूप कमी आहेत त्या कॅरी करणे टाळा. या पद्धतीमुळे तुम्हाला कॉकटेल पार्टीमध्ये थोडेसे अवघड वाटू शकते.

जीन्स घालू नका : बहुतेक लोकांना असे वाटते की कॉकटेल पार्टीसाठी जीन्सचा कॅज्युअल लुक सर्वोत्तम आहे. हा लूक आरामदायक असू शकतो, परंतु कॉकटेल पार्टीमध्ये ते थोडेसे गबाळ्या पद्धतीचे दिसू शकते. कॉकटेल पोशाखासाठी, आकर्षक आणि आरामदायक असे काहीतरी निवडा. जीन्सऐवजी स्लीक ट्राउझर्सची फॅशन तुम्ही निवडू शकता.

कोणत्या प्रकारची बॅग निवडावी: मोठ्या आकाराच्या बॅगमध्ये बरेच सामान बसू शकते परंतु कॉकटेल पार्टीमध्ये ती उठून दिसणार नाही. तुमचा ड्रेस लपणार नाही अशी बॅग निवडा. यासाठी तुम्ही क्लच वापरू शकता.

सुरकुत्या असलेले कपडे घालू नका: जर तुम्ही पार्टीला असा ड्रेस घातला की ज्यावर सुरकुत्या दिसत असतील तर तो निष्काळजीपणा लोकांच्या नजरेत येईल. प्रेस केलेला आणि स्वच्छ दिसणारा ड्रेस निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT